डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले अन् डिगे कोल्हापूरचे खासदार झाले

ऐनवेळी विधानसभेच्या निवडणुकीत उतरून लक्षवेधी मते घेणारे कै. डिगे यांचा लोकसभेतील (gmeet)विजय मोठा झाला. विधानसभा निवडणूक ही त्यांच्या राजकीय आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.१९५२ चा तो काळ. राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापुरात आले होते. त्यावेळच्या राजाराम व आताच्या अयोध्या थिएटरमध्ये हे स्नेहसंमेलन झाले. डॉ. आंबेडकर त्यावेळी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे काम करत होते. त्यावेळी करवीरचे तहसीलदार होते कै. शंकरराव खंडेराव तथा एस. के. डिगे. त्याच दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या समाजातील कोण उच्चविद्याभूषित आहे का, अशी चौकशी केली.

त्यावेळी कै. डिगे यांचे नाव त्यांना कोणीतरी सुचवले आणि डॉ. आंबेडकर यांच्या पक्षाकडून कै. डिगे करवीर विधानसभेच्या रिंगणात उतरले. हा त्यांच्या राजकीय आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पुढे १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती.

कै. डिगे हे राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी. आताच्या लक्ष्मीपुरीतील रिलायन्स (gmeet)मॉलला लागूनच दगड मातीच्या घरात त्यांचे वास्तव्य. शिक्षणानंतर ते स्पर्धा परीक्षेतून तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९५२ साली ते करवीर तहसीलदार या पदावर कार्यरत होते. त्याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत होते आणि कोल्हापूर हे त्याकाळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे केंद्र म्हणून परिचित होते.

कोल्हापुरात आल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी आपल्या समाजातील कोण चांगला शिकलेला तरुण आहे का, अशी विचारणा कार्यकर्त्यांना केली. काही कार्यकर्त्यांनी कै. डिगे यांचे नाव सुचवले. त्यांना बोलावून घेण्यात आले. डॉ. आंबेडकर व कै. डिगे यांची भेट झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी त्यांना नोकरीचा राजीनामा देण्याची सूचना केली व करवीर विधानसभेची निवडणूक शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या चिन्हावर लढण्यास सांगितले. डॉ. आंबेडकर यांचा आदेश मानून कै. डिगे विधानसभेच्या रिंगणात उतरले.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. प्रचारातही कै. डिगे यांनी आघाडी घेतली होती; पण मतदानाच्या दिवशीच त्यांच्या आजींचे निधन झाले. त्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर फिरता आले नाही आणि अगदी थोडक्या मतांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसचे सरनाईक विजयी झाले; (gmeet)पण या पराभवाने खचून न जाता त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे लक्ष वेधले. त्यानंतर १९५७ साली त्यांचा विचार लोकसभेच्या निवडणुकीसाठी झाला. वास्तविक कोल्हापुरात स्वतः डॉ. आंबेडकर हेच १९५७ च्या निवडणुकीत रिंगणात उतरणार होते; पण त्यांचा १९५६ साली अकाली मृत्यू झाला आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आभाळ कोसळले.

ऐनवेळी विधानसभेच्या निवडणुकीत उतरून लक्षवेधी मते घेणारे कै. डिगे यांचा लोकसभेतील विजय मोठा झाला. विधानसभा निवडणूक ही त्यांच्या राजकीय आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. अतिशय साधी राहणी, उच्च विचारसरणी असा त्यांचा व्यवहार राहिला. आज एक-दोन वेळा नगरसेवक झालेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती डोळे विस्फरायला लावणारी होती; पण त्या काळात खासदार असून कै. डिगे यांचे कुटुंब आजपर्यंत त्या साध्या दगड मातीच्या घरातच राहत होते. अलीकडे म्हणजे गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी जुने घर पाडून त्याच जागेवर नवे घर बांधले. त्यांचे पुत्र सदानंद डिगे हे कै. डिगे यांच्या नावाने एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

हेही वाचा :

खळबळजनक ! मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार,

‘असं वाटतं कॉलेजमधील सगळ्या मुली माझ्या प्रेमात..’, तरुणाला झाला विचित्र आजार;

मोठी बातमी : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज, ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी मागितली!