भारतात अजूनही असे अनेक युजर्स आहेत जे Windows 10 चा वापर करत आहेत. आता युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खंर तर आता माइक्रोसॉफ्टने(Microsoft)Windows 10 चा सपोर्ट अधिकृतपणे बंद केला आहे. आता युजर्सच्या मनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता Windows 10 चा सपोर्ट कायमसाठी बंद करण्यात आला आहे, त्यामुळे आता त्यांचे लॅपटॉप आणि सिस्टम कशा प्रकारे काम करतील? जर Windows 10 चा सपोर्ट बंद झाला तर काय होईल आणि लोकांकडे आता कोणते पर्याय आहेत याबाबत आता जाणून घेऊया.

Windows 11 कंपनीचे लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे, ज्याला माइक्रोसॉफ्टने चार वर्षांपूर्वी लाँच केले होते. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर केवळ 40% यूजर आता Windows 10 चा वापर करत आहेत. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2025 पर्यंत जगभरातील सुमारे 40% विंडोज यूजर्स अजूनही Windows 10 चा वापर करत आहेत. केवळ यूकेमध्ये सुमारे 50 लाख लोकं जुन्या सिस्टमवर काम करत आहेत. त्यामुळे या लोकांना सायबर हॅकर्सचा धोका आहे.

Microsoft ने Windows 10 चा सपोर्ट बंद केला आहे, याचा अर्थ ही सिस्टम काम करणं बंद करेल असं होत नाही. ही सिस्टम आधी ज्याप्रमाणे काम करत होती, आता देखील तशीच काम करणार आहे. पण आता Windows 10 कंप्यूटरमध्ये फीचर अपडेट्स दिले जाणार नाहीत. Windows 10 साठी आता माइक्रोसॉफ्ट टेक्निकल असिस्टेंस देखील दिला जाणार नाही.

Microsoft चं असं म्हणणं आहे की, Windows 11 सध्याच्या सुरक्षा गरजा लक्षात घेऊन बनवले आहे. जर तुमचा कंप्युटर चार वर्ष जुना आहे तर तो windows 11 ला सपोर्ट करेल. यासाठी माइक्रोसाफ्टने एक फ्री कम्पैटिबिलिटी टूल देखील दिलं आहे. जर अपग्रेड करणं शक्य होत नसेल तर तुम्ही माइक्रोसॉफ्टच्या ‘Extended Security Updates’ सर्विसचा वापर करू शकणार आहेत, जो 13 अक्टूबर 2026 पर्यंत सुरक्षा देणार आहे. माइक्रोसॉफ्ट अकाउंटवरून साईन ईन केल्यास ही सर्विस फ्री आहे. अन्यथा, त्याची किंमत सुमारे $30 किंवा 1,000 मायक्रोसॉफ्ट(Microsoft) रिवॉर्ड्स पॉइंट्स आहे.

आता कंपनी Windows 10 साठी कोणतेही अपडेट जारी करणार नाही किंवा तांत्रिक सहाय्य किंवा समर्थन देणार नाही. कंपनीच्या या कारणामुळे तुमच्या लॅपटॉप आणि सिस्टमची सिक्योरिटी धोक्यात येणार आहे. इंटरनेटद्वारे दररोज नवीन धोके उद्भवतात आणि नवीनतम अपडेट्सशिवाय, तुमचा संगणक एक्स्टर्नल थ्रेट्स डिटेक्ट करू शकणार नाही. यामुळे हॅकर्सना तुमचा पीसी किंवा लॅपटॉप धोक्यात आणणे अत्यंत सोपे होते.

हेही वाचा :

मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य…

महिलांसाठी खास योजना! शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार देतंय ९० टक्के सब्सिडी..

HSRP नंबर प्लेट अद्यापही लावली नाही? ही माहिती तुमच्याचसाठी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *