सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल ४७ तोळे सोनं चोरीला(Theft) गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र अखेर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या टोळीचा मुख्य सूत्रधार संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५, रा. कासारी, ता. आष्टी) याला अटक केली आहे.

सांगली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या मदतीने आरोपींचा माग काढला. तसेच, पुणे ग्रामीण (Theft)पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीने (मोहन भोसले) घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर सांगली पोलिसांचं पथक तातडीने आष्टी तालुक्यात दाखल झालं.
मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री आष्टी पोलिसांच्या मदतीने सांगली पोलिसांनी कासारी गावातील पारधी वस्तीत छापा टाकून अत्यंत गुप्त पद्धतीने संतोष भोसलेला अटक केली. या कारवाईमुळे घरफोड्यांचा मुख्य गुन्हा उघड झाला असून पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तथापि, या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नेमणूक केली आहे.या प्रकरणातील तपासात आष्टी पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या घरफोड्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आता काहीसा विराम मिळाला असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा :
विकी कौशलनं कतरिनाच्या डिलिव्हरीबद्दल दिली हिंट…
रेशन कार्डधारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर…
मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट…