दिनेश कार्तिक नंतर आता टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

आयपीएल 2024 मध्ये लीग सामन्यात सलग सहा सामने जिंकत ऱयल चॅलेंजर्स बंगळुरुने दणक्यात प्ले ऑफमध्ये(cricket) प्रवेश केला. पण प्ले ऑफमध्ये राजस्थान रॉयल्ससमोर बंगळुरुने सपशेल शरणागती पत्करली आणि सलग 17 व्या आयपीएलचं जेतेपद मिळवण्याचं बंगळुरुचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर बंगलोरचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने क्रिकेटला अलविदा केला. सामन्यानंतर कार्तिकला गार्ड ऑफ हॉनर देण्यात आला. आता दिनेश कार्तिक नव्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेश कार्तिकचा टी20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीच्या कमेंटेटर पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दिनेश कार्तिकनंतर आता टीम इंडियाचा(cricket) आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे. टीम इंडियाचा गब्बर आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. शिखर धवन गेल्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. शिखर धवन टीम इंडियासाठी 2022 मध्ये शेवटचा खेळला होता. शिखरचं वय आता 38 आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामनो तो तीन वर्षांपूर्वी खेळला होता. आता आयपीएलमध्येही त्याची कारकिर्द संपताना दिसत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातो तो पंजाब किंग्सचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे तो सुरुवातीचे केवळ पाच सामने खेळू शकला. त्यानंतर पंजाबची धुरा सॅम करनकडे सोपवण्यात आली होती.

क्रिकेटमधून निवृत्त होणार का या प्रश्नावर उत्तर देताना शिखर धवन याने वृत्त फेटाळून लावलं आहे. पुढचे काही वर्ष क्रिकेट खेळणार असल्याचं त्याने म्हटलंय. आपण सध्या वाईट काळात जात आहोत, पण वाईट काळ जास्त दिवस राहात नाही. पुढची एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष खेळू शकतो असा विश्वास शिखर धवनने व्यक्त केलाय. यंदाच्या आयपीएल हंगामात खूप कमी सामने खेळता आले. पण आता मी दुखापतीतून सावरतो आहे, अजून मी पूर्णपणे फिट नसल्याचंही धवनने सांगितलं.

शिखर धवन टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2010 साली तर कसोटी क्रिकेटमध्ये 2013 मध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तो टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 2315 धावा केल्या असून 7 शतकांचा समावेश आहे. तर 167 एकदिवसीय सामन्यात 6793 धावा त्याच्या नावावर आहेत. यात त्याने 17 शतकं ठोकलीत.

हेही वाचा :

लै बेक्कार! भर वर्गात शिक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी Video Viral

निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेल, म्हणणारे माजी मंत्री अडचणीत

धक्कादायक! 8,000हून अधिक आयआयटीयन विद्यार्थी बेरोजगार