लोकसभेच्या निकालानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आरबीआयकडून नवा रेपो रेट जाहीर
रेपो रेटच्या दरांबाबत सामान्य नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक(rbi) बतमी समोर आली आहे. आरबीआयने यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट यावेळी स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो रेट बाबत निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लोनवरील हप्ता देखील वाढणार नाहीये.
गव्हर्नर शक्तिकांत दास(rbi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ केली होती. त्यानंतर दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आतापर्यंत रेपो रेट ६.५ टक्के करण्यात आला होता. त्यावर आता आर्थिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये रेपो रेटसाठी झालेल्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून रेपो रेट ठरवण्यासाठी समितीची (MPC) स्थापन केली होती. ५ जून २०२४ पासून यावर बैठक सुरू होती. ७ जून रोजी देखील यावर बैठक झाली. त्यानंतर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली आहे.
रेपो रेट स्थिर ठेवण्यासाठी बहुमताने निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ४:२ असं बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता रेपो रेट ६.5 करण्यात आलंय.
हेही वाचा :
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरी, १० तोळे सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला
इलॉन मस्कच्या निर्णयामुळे भारतात एक्सवर बंदी?
निवडणूक जिंकताच सुप्रिया सुळे यांचं अजितदादांना खुलं आव्हान, आता थेट…