सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड

बॉलीवडूचा भाईजान सलमान खानच्या जीवाला असणारा(filmy4wap) धोका कायम आहे. काही आठवड्यांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानच्या वांद्रे येथील घरावर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर आता सलमानला मारण्यासाठीचा नवा कट या टोळीनं आखला होता अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. हा गट उधळण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सलामनावर हल्ला करण्यासाठी बिश्नोई टोळीने थेट पाकिस्तानी शस्त्र तस्करांच्या मदतीने एके-47 हे घातक शस्त्र मागवल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

सलमानवर हा संभाव्य हल्ला करण्याच्या तयारी असलेल्या टोळीतील चार संशयितांना(filmy4wap) अटक केल्याची माहिती पनवेलमध्ये शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या टोळीतील 20 जण अद्याप फरार असल्याने सलमानच्या जीवाला असणारा धोका अद्याप कायम आहे. नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. सलमानच्या वांद्र्यातील घराबरोबरच पनवेलमधील फार्म हाऊसची या टोळीनं रेकी केली होती. मागील बऱ्याच काळापासून या टोळीकडून सलमानच्या या दोन्ही घरांची टेहाळणी सुरु केलेली. सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानमधून एके-47 खरेदी करण्याचा या टोळीचा कट होता.

2023 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना गुप्त बातमीदाराकडून सलमानच्या घराची रेकी सुरु असल्याची माहिती मिळालेली. यानुसार पोलिसांनी संशयितांचे मोबाइल फोन टॅप करण्यास सुरुवात केली. या फोन टॅपिंगदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे आणि संदर्भ पोलिसांच्या हाती लागले आहेत, असं पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

फोन टॅपिंगच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई तसेच गोल्डी ब्रार(filmy4wap) यांच्या टोळ्यांबरोबर थेट संपर्कत अशलेला अजय कश्यम ऊर्फ धनंजन तपेसिंग हा मुख्य मध्यस्थ पोलिसांना सापडला आहे. अजय हा 28 वर्षांचा असून गोल्डी ब्रारच्या टोळीच्या माध्यमातून तो पाकिस्तानमधील शस्त्र तस्कराच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. गोल्डी ब्रार हा कॅनडामधून टोळी चालवतो. तो पाकिस्तानमधील डोगर नावाच्या शस्त्र तस्कराच्या संपर्कात होता आणि त्याच्या माध्यमातून अजही या तस्कराच्या संपर्कात होता असं तपासात उघड झालं आहे. अजय हा मागील अनेक महिन्यांपासून पनवेलमधील एका छोट्या गावात वास्तव्यास होता. अजय खिडुकपाडा येथे वास्तव्यास होता असं पोलिसांनी सांगितलं.

सलमानला मारण्याच्या या कटामध्ये गोल्डी ब्रार, बिश्नोई टोळी अन् डोगर या शस्त्र तस्कराबरोबरच इतर अनेकजण सहभागी आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. सदर कटामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. कटात सहभागी असलेल्यांमधील ही महिला म्हणजे आनंदपालची मुलगी चिनू. चिनू टोळीचा सलमानला मारण्याच्या या कटात सहभाग आढळून आला आहे. सूखा शूटर, संतप नेहरा या गुन्हेगारांबरोबरच 70 हून अधिक जण या कटात सहभागी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 18 वर्षांखालील 40 हून अधिक जण या टोळीत सक्रीय आहेत. सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून तस्करीच्या माध्यमातून एके-47, एम-16, एके-92 अशी हत्यारं खरेदी करण्यासाठी पैसे पाठवण्याचं काम या टोळ्यांच्या माध्यमातून सुरु होतं. पोलिसांनी वेळीच हा कट हाणून पाडला आहे.

हेही वाचा :

प्रवाशांसाठी आनंदवार्ता! हवाई प्रवास आता आणखी स्वस्त होणार

कोल्हापूर हातकणंगले कार्यकर्त्यांची वाढली उत्कंठा ! कोण मारणार बाजी…

रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते…!