मलायका-अर्जुन कपूरचा खरंच ब्रेकअप झालाय का?
बीटाऊनचं फेमस कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर(break up) सध्या त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. काल (३१ मे) त्यांच्या ब्रेकअपचं वृत्त आलं आणि त्यांच्या ब्रेकअपची बातमी सोशल मीडियासह सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अभिनेत्री मलायका अरोराच्या मॅनेजरने घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी खोटी असल्याचा खुलासा मलायकाच्या मॅनेजरने केला आहे.
घटस्फोटाची बातमी सगळीकडे(break up) वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मलायकाच्या मॅनेजरने नुकतेच एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली आहे. इंडिया टुडेला तिने स्वत: मुलाखत दिली आहे. “मलायका अजूनही अर्जुनला डेट करत आहे. त्यांच्या ब्रेकअपचं वृत्त खोटं आहे, या निव्वळ अफवा आहेत.” असं तिने उत्तर दिलेले आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुन दोघेही एकमेकांना २०१९ पासून डेट करीत आहेत. मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पण आता तब्बल सहा वर्षांनंतर या दोघांचेही नाते संपले आहे. आता ते वेगळे झाले आहेत.
मलायका आणि अर्जुनच्या विश्वासनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोघांचेही नातं खूप खास आणि उत्तम होतं. कायमच ते दोघेही एकमेकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवतील. दोघांनीही आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि या प्रकरणी त्यांनी मौन पाळले आहे. ते कुणालाही त्यांच्या नात्यात ढवळाढवळ करु देणार नाहीत.
दोघांचंही नातं खूप छान आणि सुंदर होतं, पण आता ते वेगळे होत आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या नात्यात काही मतभेद आले आहेत. कायमच ते एकमेकांप्रती आदर करत आले आहेत. ते दोघेही एकमेकांसाठी कायमच एक आधारस्तंभ म्हणून राहिले आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात आपलं नातं खूप जपलं आहे. जरीही त्यांनी आता वेगळा होण्याचा निर्णय घेतला असला तरीही ते कायमच एकमेकांचा आदर करतील. दोघे काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या भावनिक वेळी त्यांना त्यांचा उत्तम वेळ स्पेंड करून देतील अशी अपेक्षा त्यांची चाहत्यांकडून आहे.”
हेही वाचा :
शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार
जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद
हनीमून पॅकेजच्या नावाखाली फ्लॅटमध्ये सुरु हाेतं भलतंच