बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…

अनंत जोग यांनी बाळासाहेब ठाकरेंची पहिल्यांदा भेट(visit) घेतली होती त्यादरम्यान हा किस्सा घडला.

मराठी, तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते अनंत जोग यांना त्यांचा पहिला चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाला होता. खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्यानं अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं. बाळासाहेबांनी अनंत जोग यांचं काम पाहून त्यांना भेटायला बोलावलं होतं.

अनंत जोग यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते  बाळासाहेब ठाकरे यांना कसे भेटले, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नेमकं कनेक्शन काय याबद्दल त्यांनी सांगितलं.

सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत अनंत जोग म्हणाले, “माझी तेव्हा ‘कुछ खोया, कुछ पाया’ ही मालिका सुरू होती. तेव्हा ती बाळासाहेब ठाकरेंनी पाहिली आणि नंतर ते मला राज ठाकरेंच्या लग्नात भेटले. तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंना पर्सनली बघत होतो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि ते म्हणाले की, मला वाटतं तुम्ही हिंदी सिनेमात काम केलं पाहिजे. आपला नाना बघा कसा पुढे गेला. मी त्यांना म्हटलं की, बाळासाहेब एक तर माझी तिथे कोणाबरोबर ओळख नाही आणि माझा स्वभाव असा नाही की, मी जाऊन…”

बाळासाहेब म्हणाले, “नाही नाही; तुम्ही उद्या येऊन बंगल्यावर भेटा”

अनंत जोग पुढे म्हणाले, “मला हे राजकारणातलं काही कळेना. माझा मित्र विजय गोखले त्याचे वडील खासदार होते. तेव्हा मी त्याला म्हटलं, असं असं झालंय. तर, जाऊ का भेटायला? त्यांच्या लक्षात असेल का, त्यांनी मला बोलावलंय ते? तर तो मला म्हणाला की, जा बाळासाहेबांची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे

हेही वाचा :.

आऊटडोअर फोटोशूट करताना ‘ही’ काळजी जरूर घ्या, नाहीतर…

तुम्ही आणि तुमचे हृदय खरंच तंदुरुस्त आहे का?

दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर