इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या 65 व्या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. 23 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र आता या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं असून, लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये सामना खेळवला जाणार आहे(Virat Kohli). पावसामुळे सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.

बंगळुरुचा हा घऱच्या मैदानावर अखेरचा सामना होता. याचा अर्थ आता बंगळुरुच्या चाहत्यांना विराट कोहलीला(Virat Kohli) चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळताना पाहता येणार नाही. बंगळुरु आता आपले दोन्ही शेवटचे सामने लखनऊत खेळणार आहे. सनरायजर्स हैदराबादनंतर लखनऊविरोधात 27 मे रोजी एकाना स्टेडिअममध्ये बंगळुरु संघ खेळताना दिसेल.
सनरायजर्सला मंगळवारी संध्याकाळी बंगळुरुसाठी उड्डाण करायचं होतं. त्यांना बंगळुरुविरोधातील सामन्यासाठी लखनऊमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. आरसीबीला मैदान बदललल्याची माहिती मंगळवारी दुपारी देण्यात आली. बंगळुरुच्या हवामान विभागाने यल्लो अलर्ट जारी केल्यानंतर मैदान बदलावं लागलं आहे. हवामान विभागाने गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
आयपीएल 2025 नव्याने सुरु झाल्यानंतर आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील 17 मे रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता. विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला निरोप देण्याच्या हेतून चाहते सफेद रंगाच्या जर्सीत दाखल झाले होते. पण पावसामुळे त्यांना विराटला खेळताना पाहता आलं नाही. त्यातच आता चिन्नास्वामी स्टेडिअममध्येही ते खेळताना पाहू शकणार नाहीत.

आयपीएल 2025 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 3 मे रोजी खेळला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. क्वालिफायर 2 चा सामनाही इथेच खेळला जाणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर चंदीगढच्या मुल्लांपूर येथे होईल. पण अद्याप आयपीएलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
धोनीच्या निवृत्तीवर मोठे अपडेट समोर, अखेर कोचने तीन शब्दात खरं काय ते सांगून टाकलं
महत्त्वाची बातमी! Asia Cup 2025 न खेळण्याबाबत BCCI ने अखेरीस सोडले मौन
मोठी बातमी! 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक