धोनीच्या निवृत्तीवर मोठे अपडेट समोर, अखेर कोचने तीन शब्दात खरं काय ते सांगून टाकलं

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला यावेळी आयपीएलच्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. यामुळे एमएस धोनीबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की हा त्याचा शेवटचा आयपीएल होता आणि तो लवकरच निवृत्तीची(retirement) घोषणा करू शकतो. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी यावर एक विधान दिले आहे.

आज चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघ आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, जेव्हा सीएसके प्रशिक्षकांना धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, “मला माहित नाही.” आयपीएल 2025 पूर्वी धोनीला 4 कोटी रुपयांना राखण्यात आले होते, त्याचा करार 3 वर्षांचा होता. धोनी याआधीही निवृत्तीची(retirement) घोषणा करू शकतो.

आयपीएल 2025 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते, त्यामुळे त्यांना बदली खेळाडू म्हणून अनेक तरुण खेळाडूंसोबत करार करावा लागला. 17 वर्षीय आयुष म्हात्रे, 22 वर्षीय डेवाल्ड ब्रेव्हिस आणि 26 वर्षीय उर्विल पटेल यासारख्या तरुण खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले. या तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत खेळलेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावित केले आहे.

फ्लेमिंग म्हणाले की, “तो अनुभवी खेळाडूंचा चाहता आहे, परंतु त्याला संघात तरुण खेळाडू आणायचे आहेत. त्यांचा प्रभाव निश्चितच सकारात्मक राहिला आहे, कारण हा एक आव्हानात्मक हंगाम होता, परंतु आम्हाला लवकरच लक्षात आले की आम्ही गतीपेक्षा मागे आहोत.

त्यामुळे या खेळाडूंना आणणे हे भविष्यासाठी निश्चितच योग्य आहे कारण आम्ही संघाची पुनर्बांधणी करत आहोत आणि आम्ही कसे खेळतो याचे आमचे तत्वज्ञान पुन्हा विकसित करत आहोत. मला वाटते की तरुणाई आणि अनुभवाचे मिश्रण असले पाहिजे. मी अनुभवाचा चाहता आहे, अनुभवाने स्पर्धा जिंकल्या जातात. पण या देशात तरुणाई आणि प्रतिभा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही.”

हेही वाचा :

उच्च रक्तदाब तरुणांमध्ये वाढवतोय हृदयविकाराचा धोका

हृतिक- ज्युनियर एनटीआर अफलातून जुगलबंदी; ‘वॉर २’चा धमाकेदार टीझर रिलीज

एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज मोफत