उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळपास २० वर्षांनी एकाच मंचावर एकत्र दिसले.(together) यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढू शकतात असे सुतोवाच दोन्ही बंधूंनी केले आहेत. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे विजय मेळावा आयोजित करण्यात आली होती. हिंदी भाषा सक्तीविरोधात आणि राज्य सरकारने सरकारी निर्णय मागे घेण्याच्या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पुढील निवडणुका सोबत लढवू असं म्हटलंय. आम्ही आता एकत्र आलो आहोत तर एकत्र राहण्यासाठी. एकत्रितपणे आपण मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू, ठाकरे गट शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर खासदार संजय राऊत यांनी मविआबाबत मोठं विधान केलंय. जनतेने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आणलंय.
तर एकत्र निवडणूक लढवायची की नाही, याबाबत चर्चा केली जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही अजूनही इंडिया अलायन्सचा भाग आहोत, पण स्थानिक निवडणुका वेगळ्या आहेत. तिथे निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात, वेगळी युती असू शकते.(together) ठाकरे कुटुंब एकत्र आलेत, आता राजकारणही एकत्र दिसतील. ते म्हणाले की, आम्ही शिंदे यांना पक्षाचा भाग मानत नाही. हे सर्व लोक अमित शहा आणि भाजपच्या भरवशावर जगतात. त्यांनी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत, असं संजय राऊत दोन्ही बंधू एकत्र येण्यावरून म्हणालेत.
मेळाव्यात संबोधित करताना राज ठाकरेंनी शब्दाची कोटी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. (together)दोन्ही भावांना एकत्र आणण्याचे काम बाळासाहेब ठाकरे देखील करू शकले नाहीत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, त्रिभाषा धोरणाचा खरा उद्देश मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा असल्याचं म्हटलंय.भाषेनंतर भाजपचा पुढचा मुद्दा जातीचा असेल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. भाजपची रणनीती स्पष्ट आहे – ‘फोडा आणि राज्य करा’. यावेळी त्यांनी मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या शिक्षणावरून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.
हेही वाचा :