महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.(leaders)या पार्श्वभूमीवर, पक्षाला बळकट करण्याचे काम संबंधित पक्षांकडून केले जात आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश घडवून आणण्यात आघाडीवर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच असून, मागील महिनाभरात अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.या सर्व घडामोडींनंतर आता भाजपने काँग्रेसवर एक मोठा राजकीय ‘स्ट्राइक’ केला आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते भाजपने आपल्याकडे ओढले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

तीन वेळा जालन्यातून आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर हे मंगळवारी भाजपमध्ये दाखल होणार आहेत. (leaders)या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा प्रवेश मराठवाड्यातील भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.दोन महत्त्वाचे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याने, हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये आता मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

या पक्षप्रवेशामुळे जालन्यासह नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, संबंधित जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, असे महत्त्वाचे नेते पक्ष सोडून जात असल्याने काँग्रेसला हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. (leaders)त्यामुळे, पक्षाची गळती रोखण्यासाठी आता काँग्रेसकडून काय पावले उचलली जाणार, ते पाहणेही तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा :