ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी(health insurance) हाती आली आहे. इर्डाने (भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट हटवली आहे. आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट ही एक एप्रिलपासून हटविण्यात आली आहे. यामुळे आता ६५ वय ओलांडणाऱ्या व्यक्तीला आरोग्य विमा खरेदीची संधी मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, आता कंपन्यांना आता सर्व वयोगटातील लोकांसाठी विमा उत्पादने तयार करावी लागणार आहेत.
परिपत्रकानुसार, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने भारतात आरोग्य व्यवस्था(health insurance) करण्याचा मानस आहे. तसेच कंपन्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये विविधता आणण्यासाठी परिपत्रक जारी केलं आहे. यामुळे विमा कंपन्यांना विमाधारक ज्येष्ठ नागिराकांच्या तक्रारी प्राधान्याने पाहाव्या लागणार आहेत.
विमा नियामकाच्या परिपत्रकामुळे ६५ वय ओलांडणाऱ्या व्यक्तींना नवीन आरोग्य विमा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या परिपत्रकानुसार, विमा कंपन्यांना कर्करोग, हृदय आणि एड्स सारख्या गंभीर आजारांच्या व्यक्तींना देखील विमा खरेदी करण्यास नकार देता येणार नाही. तसेच विम्याचा प्रतीक्षा अवधी देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे ४८ महिन्यांचा कालावधी ३६ महिने केला आहे. या नव्या निर्देशानुसार, 36 महिन्यांनंतर आधीच अस्तित्वात असलेल्या अटींच्या आधारे दावे नाकारण्यास प्रतिबंधित केले आहे.
तत्पूर्वी, आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट काढून टाकल्याने विमा खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. विमा प्राधिकरणाने सर्व वयोगटांचा विचार करून विमा कंपन्यांना उत्पादने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विमा कंपन्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आदी वर्गातील लोकांसाठी विमा पॉलिसी तयार कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या विम्यासंबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक चॅनेल निर्माण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा :
पीएम मोदींनंतर प्रियंका गांधीं करणार ४ लोकसभा मतदारसंघांचा दौरा
‘हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला…,’ माजी खेळाडूचा धक्कादायक दावा.
‘महाराष्ट्रात याआधी असले…’, एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान