आयपीएल 2026 च्या स्पर्धेपूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. काही संघ खेळाडूंची अदलाबदल, तर काही संघ कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहेत. याच दरम्यान एक मोठी(coach) बातमी समोर आली आहे — टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग लखनौ सुपर जायंट्सचा हेड कोच होऊ शकतो.

इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, फ्रेंचायझी सध्या युवराज सिंगसोबत कोचिंगसाठी प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहे. सध्याचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत. स्थानिक भारतीय खेळाडूंसोबत तालमेल साधण्यात त्यांना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनाला असा प्रशिक्षक हवा आहे, जो खेळाडूंना प्रेरित करू शकेल आणि स्थानिक स्तरावर संवाद साधू शकेल.
फ्रेंचायझीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लखनौ सुपर जायंट्स आता भारतीय प्रशिक्षकावर विश्वास ठेवू इच्छित आहे आणि युवराज सिंगचे नाव त्यासाठी सर्वात पुढे आहे. युवराज सिंगने खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. जरी त्याने यापूर्वी कोणत्याही संघाचे अधिकृत कोचिंग केलेले नसले, तरी तो वैयक्तिक स्तरावर अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. शुभमन गिल (coach)आणि अभिषेक शर्मा या दोघांना युवराज सिंगकडून प्रशिक्षण मिळाल्याचे ज्ञात असून, त्यांच्या फलंदाजीतील सुधारणा सर्वांच्या लक्षात आल्या आहेत. त्यामुळे युवराजच्या मार्गदर्शन कौशल्यावर संघ व्यवस्थापनाचा विश्वास वाढला आहे.

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर चार हंगामांत दोनदा हेड कोच बदलले आहेत. सुरुवातीला अँडी फ्लॉवर, त्यानंतर जस्टिन लँगर, आणि अलीकडेच मेंटॉर झहीर खान यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे जर युवराज सिंगची निवड हेड कोच म्हणून झाली, तर हा संघाच्या व्यवस्थापनातील दुसरा मोठा बदल ठरेल.
हेही वाचा :
इचलकरंजीत गॅस गिझरचा भीषण स्फोट…दाम्पत्य गंभीर जखमी
10 वर्षात करोडपती होणं शक्य… SIP नाही Step up SIP निवडा,महिन्याला किती गुंतवायचे
दोन पत्नी असल्यास पेंशन कोणाला मिळणार लाभ?; नवे नियम जारी