भाजप नेत्याने हायवेवरच सुरू केलं अश्लील कृत्य; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील काही नेते सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चत आले आहेत.(highway) मोहन यादव सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. हे असतानाच मध्यप्रदेशातील आणखी एका नेत्याचे काळे कारनामे समोर आले आहेत. मंदसौर जिल्ह्यातील भाजप नेते मनोहर धाकड यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून लोकांमध्ये मनोहर धाकड कोणत्या पदावर आहेत आणि पक्षात त्यांचा स्थान काय आहे,याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मनोहर धाकड यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. मनोहर धाकड यांच्या गळ्यात भाजपचा बिल्ला असताना, त्यांच्या सोबत त्यांची पत्नीही दिसत आहे. दरम्यान पक्षाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.मध्य प्रदेशातील मंदसौर येथील रहिवासी मनोहर धाकड सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या या व्हिडिओमध्ये धाकड एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून, हा व्हिडिओ कथितपणे १३ मे रोजी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर चित्रित झाल्याची माहिती आहे.(highway) व्हिडिओतील पांढऱ्या रंगाची कार परिवहन विभागाच्या नोंदीनुसार मनोहर धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

या प्रकरणानंतर, धाकड हे भाजपचे नेते असल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला. मात्र, भाजपने यावर तात्काळ प्रतिक्रिया देत प्रेस नोट जारी केली आणि मनोहर धाकड यांना पक्षाचे कोणतेही अधिकृत पदधारक किंवा सदस्य असल्याचे नाकारले. मंदसौर जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले की, “मनोहर धाकड हे भाजपचे प्राथमिक सदस्यही नाहीत.”

पत्नी भाजपमध्ये सक्रिय, तरीही कारवाईस टाळाटाळ
मनोहर धाकड यांचे पक्षाशी अधिकृत संबंध नसले तरी त्यांच्या पत्नी सोहनबाई धाकड या भाजप समर्थित जिल्हा पंचायत वॉर्ड क्रमांक ८ मधील सदस्या आहेत. याशिवाय, त्या भाजप महिला मोर्चाच्या विभागीय उपाध्यक्षपदावरही कार्यरत होत्या. मात्र, प्रकरण समोर आल्यानंतरही त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या टाळाटाळीमागे जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. मंदसौर जिल्हा पंचायतीत एकूण १७ सदस्य असून त्यापैकी ९ भाजपचे आणि ८ काँग्रेसचे आहेत. अशा परिस्थितीत, सोहनबाई यांच्यावर कारवाई केल्यास भाजपला बहुमत गमवावे लागू शकते. (highway)सध्या जिल्हा पंचायत अध्यक्षा माजी आमदार राधेश्याम पाटीदार यांच्या सून दुर्गा पाटीदार आहेत. व्हिडिओ प्रकरणावर भाजपने स्वतःला वेगळे करून घेतले असले, तरी धाकड दाम्पत्याचा राजकीय संपर्क आणि सामाजिक ओळख लक्षात घेता, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा :

असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral

रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल