राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; ‘या’ दिवशी होणार घोषणा

नवी दिल्ली: भाजपमध्ये(political) लवकरच संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक प्रक्रिया जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यावर भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणे अपेक्षित होते. सध्या जेपी नड्डा ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणणूकीसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. मात्र आता लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे.

कधी होणार निवडणूक?
समोर आलेल्या महितीनसार, भाजप(political) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. याअंतर्गत भाजपची अनेक राज्यात संघटनात्मक निवाडणुक पार पडणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

लवकरच होणार घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रियेला वेग आला होता. मात्र पहलगाम येथ हल्ला झालयानंतर भाजपने सर्व प्रक्रिया थांबवली होती. आता परिस्थिति नियंत्रणात आल्यावर भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोणाची नावे चर्चेत?
भाजपच्या(political) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावे चर्चेत आहेत. मात्र दोघांचा अनुभव पाहता धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुए आता लवकरच भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे.

दरम्यान मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आहे. त्यामुळेनव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर 2019 मध्ये जे. पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सध्या नड्डा यांचा कार्यकाळ संपला असून, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात पावसाचा कहर; बळीराजाला अक्षरश: रडवलं, पिकांचे अतोनात नुकसान

पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा हे ऑइल

धावत्या ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग; अचानक…