सरकारकडून नागरिकांसाठी विविध बचत योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना’ या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकालीन परतावा आणि करसवलत या दोन्हींचा लाभ मिळतो. आता या योजनेचा लाभ केवळ प्रौढांनाच नव्हे, तर लहान मुलांनाही(child) मिळणार आहे. पालक आपल्या मुलांच्या नावाने PPF खाते उघडू शकतात आणि त्याद्वारे त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीची पायाभरणी करू शकतात.केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलांच्या नावाने PPF खाते उघडू शकतात. या खात्यात वर्षाला किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. यावर सध्या वार्षिक ७.१ टक्के व्याजदर लागू आहे. ही गुंतवणूक १५ वर्षांसाठी असते, म्हणजेच दीर्घकाळात मुलांना मोठा परतावा मिळू शकतो. मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो स्वतः हे खाते चालवू शकतो आणि त्यात पुढेही गुंतवणूक करू शकतो.

मुलांसाठी PPF खाते उघडल्याने त्यांच्या भविष्यातील शिक्षण, उच्च शिक्षणासाठी लागणारा निधी किंवा इतर गरजांसाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि सरकारकडून हमी दिलेली असते. त्यामुळे पालक निश्चिंतपणे या योजनेचा विचार करू शकतात.लहान मुलांसाठी PPF खाते उघडण्यासाठी पालकांनी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. तिथे PPF खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. या कागदपत्रांमध्ये मुलाचा जन्मदाखला, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला आवश्यक असतो. सर्व तपशील पडताळून घेतल्यानंतर खाते उघडले जाते.

या प्रक्रियेत पालकच खात्याचे संचालन करतात, कारण मुलाचे वय अल्पवयीन असते. मात्र, वयाच्या १८व्या वर्षी मूल स्वतः खात्याचे मालकत्व घेतो. त्या वेळी खातेवरील सर्व अधिकार त्याला मिळतात आणि तो स्वतः गुंतवणूक सुरू ठेवू शकतो. योजनेची सर्व अटी आणि लाभ प्रौढांच्या खात्यांप्रमाणेच (child)असतात.PPF खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे करसवलत आणि करमुक्त परतावा. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत मिळते. तसेच, मिळणारे व्याज आणि मुदतीनंतरचा परतावा दोन्हीही पूर्णपणे करमुक्त असतात. त्यामुळे ही योजना पालकांसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठीही फायदेशीर ठरते.

उदाहरणार्थ, जर मुलाचे वय तीन वर्षांचे असताना त्याच्या नावाने PPF खाते उघडले, तर तो १८ वर्षांचा होईपर्यंत त्या खात्यावर मोठा निधी जमा होतो. हा निधी पूर्णपणे करमुक्त असल्याने मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यातील इतर खर्चांसाठी उपयोगी पडतो. म्हणूनच अनेक पालक या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलांच्या भविष्याची आर्थिक हमी निश्चित करत आहेत.

हेही वाचा :

ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…

तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *