बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत दिवाळीचा(Diwali) जल्लोष मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. अनेक स्टार्स विविध पार्टींमध्ये सहभागी झाले, तर काहींनी घरी पूजा करून दिवाळी साजरी केली. मात्र या उत्साहाच्या दरम्यान, छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीसोबत मोठा अपघात होण्याची घटना घडली. ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक असलेली ही अभिनेत्री दिवाळीच्या दिवशी आगीत होरपळण्यापासून थोडक्यात बचावली. या धक्कादायक घटनेत तिचा जीव तिच्या वडिलांनी वाचवला.

दिवाळीच्या (Diwali)निमित्ताने बिग बॉस ९ फेम प्रिया मलिक हिच्यासोबत एक मोठा अपघात घडला. दिवाळीच्या सणाच्या आनंदात प्रिया आणि तिचे कुटुंबीय तसेच शेजारील लोक फोटो काढण्यात व्यस्त होते. अचानकच तिच्या कपड्यांना आणि केसांना आग लागली. हा अपघात फार वेगाने झाला, ज्यामुळे प्रिया स्वतःला वाचवू शकली नाही. तिचे कपडे आणि केस जळाले. प्रियाच्या उजव्या हातापासून खांद्यापर्यंत आणि पाठीवर आग लागल्याचे तिला जाणवले. प्रियाच्या वडिलांनी लगेच पुढे येऊन जळत असलेली कपडे फाडून तिला वाचवले.
प्रिया मलिकने 21 ऑक्टोबरला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले”मी माझ्या, शेजाऱ्यांसोबत फोटो काढत होतं,माझ्या उजव्या खांद्यावरून आग लागल्याचे मी पाहिले आणि मला जाणवलं की माझी संपूर्ण पाठ जळत आहे. आणि मी छोटीशी आग नव्हे तर प्रचंड आग लागल्याची गोष्ट करत आहे.माझ्या वडिलांनी लगेच माझ्या जळत असलेल्या कपड्यांना फाडलं कारण मला वाचवण्याचा एकमेव उपाय होता, पण या घटनेने मला आणि आमच्या कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे.”

प्रियाने पुढे लिहिलं की, “जिथे प्रत्येक जण फायर सेफ्टीबद्दल बोलतो आणि असं समजतो की अशा दुर्घटना त्यांच्या सोबत कधीच होणार नाहीत, तिथे काल रात्री मला जाणवलं की केवळ एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे माझा जीवही जाऊ शकला असता. त्या क्षणी माझे वडील खरे हिरो होते. मी आता ठिक आहे. माझ्या खांद्यावर, पाठीवर आणि बोटांवर किरकोळ भाजले आहे. मला अजूनही समजत नाही की मी जास्त इजा न होता कशी वाचले. पण ही घटना कदाचित मला दिवाळीनंतर कायमस्वरूपी एका मानसिक धक्क्यात टाकून गेली आहे.”

हेही वाचा :
तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल
कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral
टॉपच्या क्रिकेटरची बायको, लग्नाआधीच झाली आई आता …