राहुल गांधी यांच्याबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य, नवनीत राणा यांच्याविरोधात FIR दाखल

भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे(fir). निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आहे. राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. आज तेलंगणातील शादनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी(fir) सांगितले की, निवडणूक कर्तव्यावर तैनात निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्ण मोहन यांनी नवनीत राणा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलीकडेच एका निवडणूक सभेत नवनीत राणा यांनी राहुल गांधींना मत दिल्यास ते मत थेट पाकिस्तानात जातं, अशी टिप्पणी केली होती. हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, आम्हाला एफएसटी फ्लाइंग स्क्वॉड, निवडणूक आयोगाकडून नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार आली होती. ही तक्रार 9 मे रोजी प्राप्त झाली होती. निवडणूक ड्युटीवर तैनात निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्ण मोहन यांनी नवनीत राणा यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले.

भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यासाठी नवनीत राणा हैदराबादला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी एका जाहीर सभेत एमआयम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या बंधूंवर जोरदार निशाणा साधला. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 2013 च्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

कोणाचेही नाव न घेता त्या म्हणाल्या होत्या की, ”लहान भाऊ म्हणतोय की 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही काय करतो ते दाखवू. तर मला त्याला सांगायचे आहे की, लहान भाऊ, तुला फक्त 15 मिनिटे लागतील, मात्र आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. पोलिसांना 15 सेकंद काढले तर लहान-मोठे लोक कुठून आले आणि गेले ते कळणार नाही.” दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला आहे.

हेही वाचा :

जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

मी गॅरंटी देतो.. सलमानच्या लग्नाबाबत मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया

काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान