विराट ‘ते’ 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट!

इंडियन प्रिमिअर लीगच्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची(cricket virat) शक्यता एका क्षणी 0.02 टक्के इतकी होती. असं असतानाही आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्धचा करो या मरोचा सामना 27 धावांनी जिंकला नेट रन रेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये दणक्यात प्रवेश केला.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज(cricket virat) यश दयालने शेवटच्या ओव्हरमध्ये प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी 17 धावा हव्या असताना सातच धावा दिल्या. यशने महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजासारख्या दमदार फलंदाजांसमोर टिच्चून गोलंदाजी करत चेन्नईला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र या विजयामगे दयालच्या गोलंदाजीबरोबर विराट कोहलीने दिलेला सल्लाही कारणीभूत ठरला.

शेवटच्या ओव्हरमध्ये पात्र ठरण्यासाठी 17 धावा हव्या असताना धोनीने पहिल्याच बॉलवर खणखणीत 110 मीटरचा षटकार लगावला. त्यामुळे 5 बॉलमध्ये 11 धावा असे समिकरण झाले. धोनी आता नेहमीप्रमाणे चेन्नईच्या मदतीला धावून येत संघाला प्लेऑफ्समध्ये पोहचवणार असं वाटत होतं.

धोनीचा हा अवतार पाहून कोहली यश दयाल जवळ आला आणि त्याने दयालला शांत करण्याचा प्रयत्न केला. धोनीने पहिल्याच बॉलवर षटकार लगावल्याने दयाल गोंधळून गेला होता. विराटने दयालजवळ जात त्याला 5 शब्दांचा सल्ला दिला. हाच सल्ला दयालला फायद्याचा ठरला.

विराट दयालजवळ आला अन् त्याला, ‘यॉर्कर नको, स्लो बॉल टाक,’ असं म्हणाला. विराटचा सांगण्याप्रमाणे दयालने स्लो बॉल टाकला आणि जे अपेक्षित होतं तेच घडलं. धोनीने वेगाने बॉल येईल असा विचार करुन काही सेकंद आधीच फटका मारला. धोनीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण बॉल मैदानाबाहेर न जाता स्वप्निल सिंहच्या हातात विसावला अन् धोनी बाद झाला.

https://twitter.com/i/status/1792062192080076924

धोनी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या शार्दूलने जाडेजाला एक धाव काढून दिली. शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा हव्या असताना जडेजाला एकही धाव करता आली नाही. हा सामना आरसीबीने 27 धावांनी जिंकला. किमान 18 धावांच्या फरकाने सामना जिंकण्याचं आव्हान आरसीबीसमोर होतं. त्यांनी अधिक मोठ्या फरकाने सामना जिंकत प्लेऑफमधील चौथं स्थान निश्चित केलं.

आरसीबीचा संघ 11 व्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मात्र आरसीबीच्या संघाला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. केवळ एकदाच आरसीबीच्या संघाला फायनलपर्यंत मजल मारता आली आहे. मात्र तिथेही कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्यांना पराभूत करत विजयापासून दूर ठेवलं होतं.

हेही वाचा :

त्वचा, दृष्टी सुधारण्यास आंबा फळ आरोग्यदायी

पंतप्रधान मोदी आज २५ हजार महिलांसोबत साधणार संवाद

ब्रेकिंग! भाजप- आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, गोळीबारात एकाचा मृत्यू