राजकारण पेटले महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक शहरात लोकसभा निवडणूक(leaders) प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे हा प्रचार मुद्द्यांवरून थेट गुददयांवर पोहोचला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने नाशिकच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. सोमवारी सिडकोमध्ये प्रचार फेरी दरम्यान भाजपच्या नेत्याने शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयावर हल्ला केला.

महायुतीच्या उमेदवार(leaders) हेमंत गोडसे यांची प्रचार फेरी निघाली होती. ही प्रचार फेरी शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयासमोरून जात असताना वादग्रस्त नगरसेवक मुकेश शहाणे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयात घुसले. त्यांनी कार्यालयातील कार्यकर्त्यांना दमबाजी करीत पक्षाचे चिन्ह असलेले मशाल तोडून फेकली. त्यामुळे दोन्ही गटामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. मात्र नेत्यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थोडक्यात मिटले. एकंदरीत आता प्रचार चांगलाच टोकदार झाला आहे. दोन्ही गटात तणावाची स्थिती आहे.

हा प्रकारानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार केली. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने अखेर पोलि‍सांनी भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार समजल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले. यावेळी या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पोलिस निरीक्षकांना धारेवर धरले.

त्यानंतर माजी नगरसेवक मुकेश शहाणे अजित चव्हाण, जगन पाटील, दिलीप देवांग यांचे अनेक कार्यकर्ते जमले होते. त्या दबावामुळे पोलि‍सांनी भाजप कार्यकर्त्या अर्चना दिंडोरकर आणि सोनाली ठाकरे यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

नाशिकमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान आहे. त्यामुळे राज्यभरातील नेते नाशिकला दौरे करीत आहेत. रोज होणारे मेळावे, सभा आणि प्रचार फेऱ्या यातून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. आता प्रचार हातघाईवर गेल्याने पोलि‍सात गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे नाशिकच्या प्रचारात आता तणावाची स्थिती आहे.

हेही वाचा :

निवडणुकीनंतर बसणार धक्का, 50 ते 250 रुपयांनी महागणार मोबाईल रिचार्ज !

टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

“दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही”; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत