डोंबिवलीत एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच घरात अत्याचाराचा(raped) प्रयत्न झाला. त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव फसला आणि तिने स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

डोंबिवलीतील आयरे गावात घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. १६ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी इकबाल नन्हेबक्ष अन्सारी वय ३७ हे दोघेही एकाच घरात भाड्याने राहत होते. काही दिवसांपूर्वी मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर विकृत हेतूने(raped) हल्ला केला. त्याने विनयभंग करत जबरदस्तीने अत्याचाराचा प्रयत्न केला.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे मुलगी क्षणभर घाबरली, पण तिने हिंमत न हरवता आरोपीला प्रतिकार केला. आपल्या ताकदीने व आरडाओरड करून तिने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. आरोपी घाबरून घटनास्थळावरून पसार झाला. या संपूर्ण प्रसंगानंतर मुलीने कुटुंबियांना सर्व सांगितले. कुटुंबियांनी तातडीने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवली आणि तपास सुरू केला. काही तासांतच आरोपी इकबाल नन्हेबक्ष अन्सारीला आयरे गावातून अटक करण्यात आली.

त्याच्याविरोधात POCSO कायद्याअंतर्गत तसेच अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

या प्रकरणात १६ वर्षीय मुलीने दाखवलेले धाडस खरोखर कौतुकास्पद आहे. बिकट परिस्थितीत न घाबरता तिने दाखवलेल्या निडरतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. समाजात या मुलीच्या धैर्याचे कौतुक होत असून, महिलांना आणि मुलींना संकटाच्या प्रसंगी धाडसाने उभे राहण्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

हेही वाचा :

मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य…

महिलांसाठी खास योजना! शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार देतंय ९० टक्के सब्सिडी..

HSRP नंबर प्लेट अद्यापही लावली नाही? ही माहिती तुमच्याचसाठी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *