लस्सी प्या आणि तंदरुस्त राहा; आरोग्यावर होणारे भन्नाट फायदे…

सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर थंड रहावं यासाठी व्यक्ती विविध कोल्ड ड्रिंक, लस्सी(lassi) आणि ताक सुद्धा पितात. दहीपासून बनवलेली लस्सी काही व्यक्तींना आवडत नाही. त्यामुळे ते ताक पितात. मात्र लस्सी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे आज लस्सी पिण्याचे फायदे जाणून घेऊ.

थंडावा
उन्हाळ्यात बाहेरच्या उष्णतेमुळे शरीरातील उष्णता देखील वाढत जाते. अशावेळी शरीर थंड ठेवण्यासाठी लस्सी(lassi) फार उपयुक्त असते. दह्याचे सेवन केल्याने शरीराती उष्णता कमी होते. त्यामुळे तुम्ही थंड पिऊ शकता.

पचनक्रिया सुधारते
लस्सीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी याचं सेवन केलं पाहिजे. ज्या व्यक्तींना पोटाच्या समस्या आहेत किंवा काही कारणास्तव ज्याचं पोट साफ होत नाही त्या व्यक्तींनी लस्सीचे सेवन केले पाहिजे.

विटॅमीन आणि मिनरल्स
लस्सी प्यायल्याने त्यातील विविध घटक आपल्या शरिरात जातात. यामध्ये कॅल्शिअम, विटॅमिन डी, पोटॅशियम आणि विटॅमिन बी असते. ज्या व्यक्तींना व्हिटॅमीनची कमी असल्याने विविध पदार्थांचं सेवन करण्यास सांगितले आहे त्यांनी आपल्या डायट प्लानमध्ये लस्सी अॅड केली पाहीजे.

डिहाइड्रेशन
डिहाइड्रेशनची उन्हाळ्यात अनेकांना जानवते. डिहाइड्रेशनमुळे शरीरातील पाणी पूर्णता कमी होतं. अशावेळी त्या व्यक्तीला भूक देखील लागत नाही त्यामुळे अशक्तपणा सुद्धा येतो. तुम्हालाही अशा समस्या असतील तर लस्सीचे सेवन करण्यास सुरुवात करा.

टीप: ही फक्त सामान्य माहिती आहे.

हेही वाचा :

व्हॉट्सअपचा आलाय ‘मल्टि लॉगिन’ ऑप्शन…

आयपीएलचा अंतिम सामना फिक्स होता?, नाण्याच्या दोन्ही बाजूला हेड…Video

भारत जिंकले आता जिओची आफ्रिकन सफारी! अंबानींचा ‘या’ देशातील दूरसंचार उद्योगावर डोळा