“आताही बॅगा घेऊन आलोय…”, चक्क मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी

आज नाशिकमध्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात (political news)आली आहे. नाशिकमध्ये ते हेलिकॉप्टरने ते उतरले त्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे नेल्याचा आरोप केला होता.

गेल्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्यासोबत दोन मोठ्या बॅगा(political news) होत्या, त्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी पैसे आणल्याचा आरोप करत हल्लाबोल केला होता. यावेळी नाशिकमध्ये आल्यानंतर शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा आज रोड शो असणार आहे. यासाठी ते आज नाशिकमध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली. तर माध्यमांनी बॅगांच्या संदर्भात प्रश्न केला असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजही बॅगा घेऊन आलोय.

आज विरोधकांनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदे यांनी कृतीतून उत्तर दिल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. गेल्या वेळी नाशिकमध्ये येताना काही तासांच्या दौऱ्यासाठी आले असताना इतक्या मोठ्या बॅगा सोबत ठेवण्यावरून संजय राऊत यांनी त्या बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचंही दिसून आलं होतं

हेही वाचा :

जान्हवी कपूरने केला होणाऱ्या पतीबद्दल मोठा खुलासा

6GB रॅम अन् 6000mAh बॅटरीसह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy M35

‘मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात…’; ‘या’ अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा