पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि नेहमी वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारा शाहिद आफ्रिदी याच्या निधनाची बातमी शनिवारी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. व्हायरल व्हिडीओमध्ये एका न्यूज अँकरने आफ्रिदीच्या(captain ) निधनाचे वृत्त वाचताना दाखवले असून रुग्णवाहिकेचे दृश्यही समोर आले. या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातही खळबळ उडाली. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी असून, AI द्वारे बनवलेला फसवा व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रिकेट जगतात आफ्रिदीने(captain ) आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. २०१७ मध्ये निवृत्त झालेला आफ्रिदी हा आजही पाकिस्तानमधील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ११,००० हून अधिक धावा आणि ५४१ विकेट्स घेतल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक ३५१ षटकार मारण्याचा विक्रम आजही जपला आहे.
AI चा वापर करून पसरवली अफवा
तपासानंतर स्पष्ट झाले की, आफ्रिदीच्या निधनाची बातमी देणारा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने तयार करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये आवाज, दृश्य आणि माहिती इतकी खोटी पद्धतीने सादर करण्यात आली होती की अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला. पाकिस्तानमधील ‘व्हिजन ग्रुप’च्या अध्यक्षांनी शोक व्यक्त केल्याचेही या व्हिडीओत खोटे दावे करण्यात आले.
शाहिद आफ्रिदीने स्वतः दिला खुलासा
या अफवेमुळे गोंधळ उडाल्यानंतर शाहिद आफ्रिदीने स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली. “मी पूर्णपणे सुरक्षित आणि तंदुरुस्त आहे. कृपया अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. या प्रकारांमुळे माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत आहे,” असे आफ्रिदीने ट्विटद्वारे सांगितले.
View this post on Instagram
भारत सरकारची कारवाई
दरम्यान, भारतातील पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातील काही न्यूज पोर्टल्स, सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली आहे. यामध्ये शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनल व इतर सोशल मीडिया हँडल्सचाही समावेश आहे.
हेही वाचा :