कोल्हेंचा डबल धमाका; सकाळी पाचुंदकरांची घरवापसी, संध्याकाळी देशमुखांचा प्रवेश

भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे(at home) निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी नुकताच (ता.८) पक्षाला रामराम ठोकला. त्याच दिवशी सरकारनामाने दिलेल्या बातमीत ते शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. ते तीन दिवसांत गुरुवारी (ता.११)संध्याकाळी खरे ठऱले.

देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार(at home) यांच्या उपस्थितीत पुण्यात तुतारी फुंकली. त्यामुळे या पक्षाचे शिरूरमधील लोकसभेचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांचा २४ तासात डबल धमाका केला. त्यातून अजित पवार राष्ट्रवादीला डबल धक्का बसला.

सकाळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विश्वासू सहकारी शेखर पाचूंदकर यांनी घरवापसी केली. म्हणजे ते शरद पवार राष्ट्रवादीत आले. त्यांचे शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील ४२ गावात मोठे वलय असल्याने त्याचा फायदा कोल्हेंना होणार आहे. त्यानंतर खेड तालुक्यात विशेषत तरुणाईत मोठी क्रेझ असलेले देशमुख यांनी संध्याकाळी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कोल्हेंचा डबल धमाका झाला.

खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात त्यातही पश्चिम पट्यात देशमुखांची मोठी ताकद आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये नाराज होते.अशातच सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत आपले हाडवैरी आणि अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना लोकसभेला काम करावं लागणार होतं. ते न पटल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत हातात तुतारी घेतली.

मागील विधानसभेला त्यांनी आपली ताकद दाखबून दिली होती.मात्र, काही दिवसांपासून भाजपमध्ये वाट्याला येत असलेला अपमान आणि खेड तालुक्यात सुरु असलेले दडपशाहीचे राजकारण याला वाचा फोडण्यासाठी देशमुख यांनी पक्ष सोडला. खेड तालुक्यातील अनेक सरपंच,उपसरंपच,आळंदी,खेड,चाकणचे अनेक माजी नगरसेवक सोबत असल्याचे त्यांनी प्रवेशानंतर सांगितले.

हेही वाचा :

मंडलिकांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत कडाडले

सलमान खानचा छिद्र असलेला टी-शर्ट पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

कहरच! बाजारात विक्रीला आणलेले गाजर पायाने धुतले