दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; चांदीही झाली स्वस्त..
गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किंमतीत प्रचंड तेजी(silver price) दिसून येत होती. काही दिवसांपूर्वीच सोन्याचा भाव हा तब्बल 74,000 रुपये प्रतितोळा एवढा झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसांमध्ये या किंमती पुन्हा झपाट्याने खाली आल्याचं दिसत आहे. वायदे बाजारात (MCX) सोनं सुमारे 2,500 रुपयांनी स्वस्त झाल्याचं दिसत आहे.
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याची(silver price) किंमत 71,486 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. 5 जूनच्या वायद्यासाठी सोन्याची किंमत ही गेल्या दहा दिवसांमध्ये भरपूर कमी झाली आहे. 16 एप्रिल रोजी सोन्याची किंमत ही सुमारे 74,000 प्रतितोळा एवढी होती, जी आता कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमती सुमारे 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
एमसीएक्सवर केवळ सोनंच नाही, तर चांदीच्या किंमतीमध्ये देखील मोठी घट झाल्याचं दिसत आहे. 16 जून रोजी चांदीची किंमत 85,000 रुपये किलो एवढी होती, जी आता कमी होऊन 82,500 एवढी झाली आहे. म्हणजेच, सोन्यासोबत चांदीच्या किंमतीमध्ये देखील सुमारे 2,500 रुपयांची घट झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये इस्राइल आणि इराणमध्ये युद्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे गुंतवणुकदार रिलॅक्स झाले असून, सोन्याची खरेदी देखील कमी झाली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सोनं हे सुमारे 70 हजार रुपये प्रतितोळा एवढं खाली घसरेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :
मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळें
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ
महाविकास आघाडीला मोठा धक्का; महायुतीची ताकद वाढली