सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा घसरले

काल सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर(gold prices) घसरले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा सोनाराच्या दुकानात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याच्या दरामध्ये आज किरकोळ घसरण झाली आहे. मंगळवारी सोन्याची चकाकी १० रुपये प्रति तोळ्याने उतरल्याचे समजले आहे.

सध्या मे महिना सुरू आहे. त्यात सोमवारी अवकाळी पावसाने मुंबईत(gold prices) हजेरी लावली. आता मे महिना म्हणजे लग्नसराईचा महिना. या महिन्यात पाऊस पडला तरी अनेकांची हळदी आणि लग्नाची लगबगही थांबलेली नाही. त्यासह नागरिक आपल्या वधू आणि वरासाठी दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत. आता आज तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर जाणून घेऊ आजचा सोन्यासह चांदीचा भाव.

मंगळवारी २२ कॅरेट सोन्याची किंमत १० रुपयांनी कमी झाली आहे. ६७,२९० प्रति तोळा आजचा भाव आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ७३,३७० रुपये प्रति तोळा आहे. यासह १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५,०५० रुपये प्रति तोळा आहे.

मुंबई-पुण्यातील सोन्याच्या किंमती
मुंबईत आज २२ कॅरेट ६७,१४० रुपये, २४ कॅरेट ७३,२४० रुपये, १८ कॅरेट ५४,९३० रुपये प्रति तोळा आहे.

पुण्यातही सोन्याचे दर घसरले आहेत. पुण्यात २२ कॅरेट ६७,१४० रुपये, २४ कॅरेट ७३,२४० रुपये, १८ कॅरेट ५४,९३० रुपये प्रति तोळा आहे.

चांदीचे दर
आज १०० ग्राम चांदीच्या किंमती प्रति किलो १०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे आजची किंमत ८६,४०० प्रति किलो आहे. मुंबईत चांदी ८६,४०० आणि चेन्नईत ८९,०००, नवी दिल्लीत ८६,४०० , पुण्यातही ८६,४०० रुपये प्रति तोळा चांदी विकली जात आहे.

हेही वाचा :

राजकारण पेटले महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा आंदोलन

“दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही”; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत