सोन्याचे दर जोरदार घसरले; दागिन्यांच्या दुकानात नागरिकांची तुफान गर्दी

सोनं खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या(jewelry shops) दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर फार वाढले होते त्यामुळे वाढत्या दरांना पाहून तुम्ही अद्याप दागिने बनवण्यास टाकले नसतील तर आज हे काम तुम्ही पूर्ण करू शकता. कारण सोन्याच्या किंमती गडगडल्यात.

शुक्रवारी २२ कॅरेट सोनं २५० रुपयांनी घसरलं(jewelry shops) आहे. त्यामुळे ६७,७५० रुपये प्रति तोळाने सोन्याची विक्री होतेय. तर २४ कॅरेट सोन्याचे दर २७० रुपयांनी कमी होऊन आज सोनं ७३,९०० रुपये प्रति तोळा विकलं जात आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमती देखील २१० रुपयांनी खाली आल्यात. त्यामुळे आज १८ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत ५५,४३० रुपये आहे.

चेन्नईमध्ये २२ कॅरेट ६,७७० रुपये २४ कॅरेट सोनं ७,३८५ तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५४६ रुपये प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये १८ कॅरेट सोनं ५,५३१, २४ कॅरेट सोनं ७,३९० आणि २२ कॅरेट सोनं ६,७७५ रुपये प्रति तोळा आहे. कोलकत्तामध्ये २२ कॅरेट ६,७६० रुपये २४ कॅरेट सोनं ७,३७५ तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति तोळा आहे. हैदराबादमध्ये १८ कॅरेट सोनं ५,५३१, २४ कॅरेट सोनं ७,३७५ आणि २२ कॅरेट सोनं ६,७६० रुपये प्रति तोळा आहे.

पुण्यात २४ कॅरेट सोनं ७,३७५ , २२ कॅरेट ६,७६० रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईतील दरामध्ये झालेल्या बदलानुसार आज मुंबईत २४ कॅरेट सोनं ७,३७५ , २२ कॅरेट ६,७६० रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति तोळा अशी सारखीच किंमत आहे.

चांदीच्या दरात आज बदल झालेला नाही. कालच चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत ८९,१०० रुपये आहे. मुंबईत चांदी ९२,५०० रुपये आणि पु्ण्यात देखील ८९,१०० रुपये प्रति किलोने चांदी विकली जात आहे.

हेही वाचा :

दोन पत्नींचं असं आहे ‘नाईट टाईमटेबल’, अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट

निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; संजय राऊतांची बोचरी टीका

प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच प्रियकराला भोसकले