उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी(industrialists) ईशा अंबानीने लंडनमध्ये पिंक बॉल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आता तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ईशा अंबानी नेहमीच तिच्या सुंदर लूकने चाहत्यांना मोहित करते. यावेळीही पिंक बॉल इव्हेंटमधील तिचा लूक पाहण्यासारखा होता. तिच्या ड्रेसपासून ते तिच्या दागिन्यांपर्यंत सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. तसेच खास गोष्ट म्हणजे तिने स्वतःच्या आईचे दागिने परिधान केले होते.

या कार्यक्रमासाठी ईशा अंबानीने गुलाबी रंगाचा चामोईस(industrialists) सॅटिन जॅकेट आणि प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांचा कॉलम स्कर्ट परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
ईशा अंबानीचा ड्रेस जुन्या गुलाबी जरदोसीमध्ये मणी, सेक्विन आणि क्रिस्टल्सने चमकदार पॅलेटमध्ये हाताने भरतकाम केलेला होता. ड्रेसवरील संपूर्ण डिझाईन खूप सुंदर आणि रेखीव दिसत होती.
या ड्रेसची खासियत म्हणजे डिझायनरने स्वतः इन्स्टाग्रामवर सांगितले आहे की ईशा अंबानीचा हा डिझायनर पोशाख ३५ हून अधिक कारागिरांनी मिळून ३,६७० तासांत तयार केला आहे. ज्यामुळे तो आणखी सुंदर दिसत आहे.
हा ड्रेस ईशा अंबानीला खूप सुंदर लूक देत होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. ईशा अंबानीने मेकअप देखील साधा आणि मोहक केला होता. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे होते.
ईशा अंबानीने आई नीता अंबानीच्या कलेक्शनमधील हिरव्या डायमंड रंगाच्या दागिन्यांसह हा ड्रेस परिधान केला. हे दागिने या ड्रेसवर खूपच सुंदर दिसत होते. ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक परिपूर्ण दिसत होता.
हेही वाचा :
दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत?
जपानची एक आगळी-वेगळी पद्धत
टॉप 10 पैकी 7 कंपन्यांनी नोंदवली 2.03 लाख कोटींची वाढ;