जर तुम्ही Reliance Jio चे प्रीपेड ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. (users)Jio युजर्ससाठी कंपनीने एक नवीन ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये युजर्सना काही ठराविक प्लॅन्ससह इंटरनेट डेटा फ्री दिला जाणार आहे. ज्या युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची गरज असते, अशा यूजरसाठी ही ऑफर उत्तम आहे. Reliance Jio ही टेलिकॉम कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. ही कंपनी सतत त्यांच्या युजर्ससाठी नवीन ऑफर्स घेऊन येत असते.
कंपनीने त्यांच्या काही ठराविक रिचार्ज प्लॅनसह 20GB फ्री डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये इतर अनेक फायदे देखील ऑफर केले जातात. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ऑफर काही निवडक प्लॅन्ससाठी सुरू करण्यात आली आहे. चला तर मग असे कोणते प्लॅन्स आहेत ज्यावर जिओची ही ऑफर सुरू करण्यात आली आहे, याबद्दल जाणून घेऊया.
Jio च्या या रिचार्ज प्लॅनमधे 72 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. शिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS देखील दिले जातात. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे आता या प्लॅनसोबत युजर्सना 20GB अतिरिक्त डेटा पूर्णपणे फ्री दिला जाणार आहे. (users)एवढंच नाही तर यूजर्सना 90 दिवसांसाठी JioCinema चा मोबाइल आणि टीवीवर फ्री अॅक्सेस देखील दिला जाणार आहे. यासोबतच 50GB JioCloud स्टोरेजचा फायदा देखील युजर्सना घेता येणार आहे. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमधे रोज इंटरनेट डेटाचा वापर करता येणार आहे, शिवाय फ्रीमध्ये एक्स्ट्रा डेटा आणि एंटरटेनमेंट व क्लाउड स्टोरेज सुविधा देखील दिली जाणार आहे
Jio चा 899 रिचार्ज प्लॅन 90 दिवसांसाठी व्हॅलिडिटी ऑफर करतो, या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा दिली जाणार आहे. या प्लॅनसह 20GB अतिरिक्त डेटा फ्रीमध्ये दिला जाणार आहे. याशिवाय, JioCinema चा मोबाइल आणि टीवी दोन्हीवर फुल अॅक्सेससह 50GB JioCloud स्टोरेजचा फायदा दिला जाणार आहे. 749 वाल्या प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनमध्ये देखील सर्व बेनिफिट्स दिले जातात. पण यामध्ये फरक केवळ इतकाच आहे की, या प्लॅनची व्हॅलिडीटी, थोडी जास्त आहे. (users)ज्यामुळे युजर्सना 90 दिवसांपर्यंत रिचार्ज करण्याचं टेंशन नाही. शिवाय युजर्स दिर्घकाळ या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात.
तुम्ही टेलिकॉम कंपनी जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा MyJio अॅपवरून किंवा पेटीएम, गूगल पे, फोनपे सारख्या थर्ड पार्टी अॅपवरून रिचार्ज करू शकता. सध्या इतर टेलिकॉम कंपन्या जसं की, एयरटेल आणि वोडाफोन-आइडिया कोणताही फ्री एक्स्ट्रा डेटा ऑफर करत नाहीत. केवळ जिओ त्यांच्या युजर्सना हा एस्ट्रा डेटा बेनिफिट देत आहे.
हेही वाचा :