आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित

व्हॉट्सअ‍ॅप जगभरातील करोडो लोकं वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने कॉलिंग मेसेजिंग सर्व काही केलं जाऊ शकतं.(break) व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्ससाठी अनेक वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहेत. आपण दिवसभर वेगवेगळ्या कारणांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असतो. पण काहीवेळा आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपचा कंटाळा येतो आणि व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक घेण्याची इच्छा होते. पण व्हॉट्सअ‍ॅप डिलीट केला किंवा बंद केला तर आपला सर्व डेटा हटवला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक लोकं घाबरून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करत नाही. अशा लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे.

युजर्ससाठी लवकरच येणार लॉगआउट फीचर
ज्या युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक पाहिजे आहे, अशा लोकांसाठी कंपनी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच लॉगआउट फीचर रिलीज करणार आहे. युजर्स गेल्या अनेक महिन्यांपासून या फीचरची मागणी करत होते, आता अखेर हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक पाहिजे असेल तर अ‍ॅप डिलीट करावा लागत होता. मात्र आता असं होणार नाही. आता लवकरच युजर्ससाठी लॉगआउट फीचर रिलीज केलं जाणार आहे.

या युजर्ससाठी ठरणार फायद्याचं
ज्या युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक पाहिजे आहे, ते या फीचरचा वापर करू शकतात. या फीचरमुळे डेटा डिलीट होण्याची भिती देखील राहणार नाही. हे नवीन फीचर युजर्ससाठी फायद्याचं ठरणार आहे. आता युजर्स कोणत्याही अडचणीशिवाय व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक घेऊ शकणार आहेत.(break) लवकरच हे नवीन फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.

कसं काम करणार हे नवीन फीचर?
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचं लॉगआउट फीचर फेसबुक किंवा जीमेल प्रमाणेच काम करणार आहे. लॉगआऊट केल्यानंतर तुमचा मेसेज, ग्रुप आणि मीडिया सर्वकाही सुरक्षित राहणार आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षित पाहायला मिळणार आहे. सुट्ट्यांच्यावेळी हे फीचर बरंच फायदेशीर ठरणार आहे. लॉगआउट पर्यायासह, तुम्ही कधीही व्हॉट्सअ‍ॅप बंद करू शकता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा पुन्हा लॉगिन करू शकता.

एकाच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरा दोन अकाऊंट
नवीन फीचर अशा लोकांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहेत, ज्यांच्याकडे दोन व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट आहेत.(break) तुम्ही एका खात्यातून लॉग आउट करताच, तुम्ही दुसरे अकाऊंट सहजपणे सक्रिय करू शकाल, तेही कोणत्याही अडचणीशिवाय.

लॉगआउट करताना युजर्सना मिळणार दोन ऑप्शन
डेटा सुरक्षित ठेवणं- जेणेकरून तुमचे सर्व चॅट, मीडिया आणि ग्रुप मेंबरशिप सर्व काही तसंच राहिल
डेटा डिलीट करणं – जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर सर्व डेटा डिलीट करा.

हेही वाचा :