कोल्हापूर, 21 मे 2025 – राज्यात सध्या अवकाळी पावसाचा(Heavy rains) जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी १६ फूट ३ इंचांवर पोहोचली असून बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे.

सध्या बंधाऱ्यावरून सुमारे ६ इंच पाणी वाहत असून, ३ हजार क्यूसेक वेगाने पाणी कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होत आहे. यंदा कोयना आणि वारणा धरणातून नियोजित पाण्याचा(Heavy rains) विसर्ग झाल्यामुळे प्रशासनाने सुरुवातीपासूनच दक्षता घेतली होती. बंधाऱ्याची पातळी १४ फूटांवर स्थिर ठेवण्यासाठी सर्व बरगे बसवण्यात आले होते.
तथापि, मागील चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने बंधाऱ्यात पाणी साचले आणि ओव्हरफ्लो झाला.
प्रशासन सज्ज
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळावे म्हणून पाण्याचा योग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीचा धोका
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत पावसाची आणि नदीतील पातळीची माहिती गोळा करत असून आवश्यकतेनुसार मदत आणि पुनर्वसन उपाययोजना तात्काळ राबवण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोल्हापूरमध्येही हवामानातील बदलाचा फटका बसत असून आगामी काही दिवस पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
पावसामुळे आज MI v DC मॅच रद्द झाली तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर?
वैभव सूर्यवंशीने मनं जिंकली! सामन्यानंतर धोनीच्या पाया पडला; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
हटके एंट्री नवजोडप्याला पडली महागात; कमळात जाऊन बसताच लागली जोरदार आग; Video Viral