भारतीय डॉक्टरांनी कर्करोगाच्या उपचारात मोठे यश मिळवलंय. ब्लड कॅन्सर(Blood cancer)9 दिवसांत बरा होऊ शकतो, असा दावा डॉक्टरांनी केलाय. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर, तामिळनाडू आणि आयसीएमआर यांच्या सहकार्याने हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाला ‘वेलकार्टी’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्यांदाच रुग्णालयातच CAR-T पेशी बनवण्यात आल्या. या चाचणीनंतर 15 महिन्यांपर्यंत 80% लोकांमध्ये कर्करोग आढळला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

आयसीएमआरने केले जाहीर
नवी दिल्ली येथील इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने या यशाची घोषणा केली. त्यांनी याला कर्करोग उपचारातील एक मोठी प्रगती म्हटलंय. या रिसर्चच्या मदतीने 15 महिन्यांनंतरही 80% लोकांमध्ये कर्करोग आढळला नसल्याचे समोर आलंय.
आयसीएमआर म्हणतंय हे स्वस्त आणि वेगवान
आयसीएमआरने या चाचणीचे कौतुक केलंय. कर्करोगाच्या(Blood cancer) उपचारात ते स्वस्त आणि जलद असल्याचे म्हटलंय. कर्करोग उपचारातील हे यश आयसीएमआर आणि सीएमसी वेल्लोर यांनी केलेल्या क्लिनिकल चाचणीत मिळाले आहे. ज्याला ‘वेलकार्टी’ असे नाव देण्यात आलंय. रक्ताच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची असलेल्या स्वदेशी जैव थेरपी बनवण्यात भारत जगात पुढे येतोय, असंही सांगण्यात आलंय.

मॉलिक्युलर थेरपी ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित
या अभ्यासाचे निकाल मॉलिक्युलर थेरपी ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यानुसार डॉक्टरांनी पहिल्यांदाच रुग्णालयातच CAR-T पेशी तयार केल्या आणि त्यांची रक्त कर्करोगाच्या रुग्णांवर चाचणी केली. येथे CAR-T थेरपीची चाचणी तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) आणि मोठ्या बी-सेल लिम्फोमा (LBCL) च्या रुग्णांवर करण्यात आली. याद्वारे, रुग्णांनी कर्करोगाशी लढण्यासाठी त्यांच्या टी-पेशी तयार केल्या.
CAR-T थेरपीचा अभ्यास
भारतातील CAR-T थेरपीचा हा पहिलाच अभ्यास नाही. याआधीही इम्यून अॅक्ट आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी एकत्रितपणे हा अभ्यास केला होता. यामध्ये पहिली स्वदेशी थेरपी विकसित करण्यात आली. जी 2023 मध्ये केंद्राने मंजूर केली.
(Desclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पावसामुळे आज MI v DC मॅच रद्द झाली तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर?
एकनाथ शिंदेंच्या शाखेत आई अन् मुलाकडून चॉपर हल्ला; काहीजण जखमी
आता दारू पिण्याऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ देशात दारू पिण्यासाठी चक्क 10 हजार लोकांची होणार भरती