उन्हाळ्यात केस गळतीची समस्या कशी टाळावी? काय घ्यावी काळजी

उन्हाळा आता सुरू झाला असून त्याच्या झळा सर्वांना(hair growth) बसत आहेत. तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. उन्हाळ्यातील गरमीने प्रत्येकजण त्रस्त असतो. उन्हाळ्यात अनेक शारीरिक आजार डोकेवर काढतात. बाहेर पडलात की ऊन तर लागतंच पण त्यासोबतच डिहायड्रेशन, पोटदुखी, मळमळ होणं, चक्कर येणं, त्वचेचे विकार हे आजार होतात. आता उन्हाळ्यामध्ये अनेकांना केसांची समस्या ही उद्भवू शकते. यामध्ये तेलकट टाळू, घाम आणि धूळ यामुळे कोंडा, खाज सुटणे आणि केस गळती याचा समावेश असतो. याची नेमकी कारणे काय? आणि कशा प्रकारची खबरदारी घ्यायला हवी, जाणून घ्या.

आजच्या जीवनशैलीत केस गळणे(hair growth) ही एक सामान्य समस्या बनली आहे. ज्यामुळे पुरूषांपासून महिलांपर्यंत स्त्रिया अस्वस्थ होतात. पण जेव्हा केसांची झपाट्याने गळती होऊ लागते तेव्हा चिंता वाढू लागते. विशेषतः केसगळती ही बऱ्याचदा अनुवंशिक, अनियमित खाणे, जास्त तणाव आणि मद्यपानाचे अतिरिक्त सेवन यामुळे होते. यासाठी केसांची योग्य काळजी राखणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये केसांची गळती मोठ्या प्रमाणात का होते? आपण नेमकी काय चूक करतो? कुठे काळजी घेत नाही? याबाबत त्वचारोग तज्ज्ञ, डॉ. शरीफा चाऊस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

उन्हाळ्यात केस गळतीची कारणे
उन्हाळ्याच्या दिवसात केसगळती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी एक प्रमुख घटक म्हणजे कडक ऊन. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे केसांची मुळ कमकुवत होऊ शकतात तर केस तुटू शकतात. उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे डोक्यात कोंडा होणे आणि फोड येण्यासारख्या समस्या उद्भवतात, परिणामी केस गळती वाढते. उन्हाळ्यात क्लोरीनयुक्त पाण्यात पोहल्याने किंवा खारट पाण्यात पोहल्याने केसांची मुळ कमकुवत होते तसेच त्यांचे नुकसान होते आणि त्यामुळे ते तुटण्याची अधिक शक्यता असते. उष्ण हवामानात ब्लो ड्रायर्स आणि स्ट्रेटनर्स सारख्या साधनांचा वापर केल्याने केस गळणे आणखी वाढू शकते.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक ठरतो. कोरडे आणि कमकुवत केस, टाळुला खाज सुटणे आणि टाळू कोरडा पडणे, घामाचा साचल्यामुळे डोक्यातील कोंडा होतो आणि बॅक्टेरियामुळे देखील केसांच्या मुळांना संसर्ग होतो (फॉलिक्युलायटिस) आणि केस गळतात. या व्यतिरिक्त पुरेसे पाणी न प्यायल्याने केस गळतीची समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात हायड्रेशन काळजी न घेतल्याने केस कमकुवत होऊन गळू लागतात. याशिवाय उन्हाळ्यात घाम येत असल्याने बऱ्याचदा डोक्यावरून अंघोळ केली जाते. यामुळेही केस गळती होते. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केस धुवावेत. याशिवाय केस घट्ट बांधून ठेवल्याने घाम येऊन त्यात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळेही केस गळू शकतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केस गळतीची ही समस्या आता महिलांसह पुरूषांमध्येही दिसून येत आहे. अनेक पुरूषांचं कमी वयात टक्कल पडतं. सध्याचं धकाधकीचं आयुष्य हे यामागील एक कारण असू शकते. केस गळतीमुळे तणाव वाढणे आणि आत्मविश्वास कमी होतो. एका अहवालानुसार भारतातील सुमारे 20 ते 30 टक्के महिला पातळ केसांमुळे त्रस्त आहेत. उतरत्या वयात केस गळायचे. परंतु, सध्या तरूण मुलींमध्येही केस गळती मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते.

उन्हाळ्यात केस गळती रोखण्यासाठी उपाय
जेव्हा उन्हाळ्यातील उष्णता असह्य होते तेव्हा आपल्या केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. टोपी घालून किंवा डोके झाकण्यासाठी स्कार्फचा वापर करणे सूर्यप्रकाशात जाणे टाळणे गरजेचे आहे. कडक उन्हामुळे केस मुळांपासून कमकुवत होतात. त्यामुळेही केस गळणे वाढू शकते. डिहायड्रेशनचा परिणाम केवळ तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच नाही तर केसांच्या आरोग्यावरही होतो. भरपूर पाणी प्या आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे जीवनसत्त्वे ए, सी आणि ई जीवनसत्वाने समृद्ध असलेले पदार्थांचा आहारात समावेश करा.

फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश असलेला आहार हा तुमच्या केसांना निरोगी राहण्यासाठी मदत करतो आणि आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतो. त्यामुळे तुम्ही केसगळती रोखू शकाल आणि केस मजबूत होण्यास यामुळे मदत मिळू शकते. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी कांद्याचा रस अतिशय प्रभावी आहे. यात सल्फरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे टाळूतील रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे केसांची वाढ होते. याव्यतिरिक्त कांद्याच्या रसात अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात, जे टाळूशी संबंधित समस्या दूर करतात.

केस गळतीवर उपचार करण्यासाठी मेथी हा अतिशय प्रभावी उपचार आहे. मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसगळती नियंत्रित करून केसांच्या वाढीस मदत करतात. तुमच्या केसांसाठी बाजारातील सौम्य उत्पादने निवडा आणि उन्हाळ्याच्या दिवसात केसांवर उष्णता निर्माण करणाऱ्या स्टाइलिंग उत्पादनांचा वापर टाळा. केसांच्या मुळांवरचा ताण कमी करणाऱ्या केशरचनांची निवड करा आणि केसांच्या मजबूतीसाठी तुमच्या दिनचर्येत नैसर्गिक तेलांचा समावेश करा.

उन्हाळ्यात केसांची अशा प्रकारे घ्या काळजी
केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर कंडिशनर लावा (शॅम्पूनंतर). केसांच्या हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशनमध्ये डीप-कंडिशनिंग हेअर मास्क देखील फायदेशीर ठरेल. स्विमींग पुलमधील क्लोरीन केस कोरडे आणि कमकुवत बनवते ज्यामुळे केस तुटतात. स्विमिंग कॅपच्या मदतीने आपले डोके झाकून आपल्या केसांची काळजी घ्या.

दररोज आठवड्यातून तीनदा केस धुवावेत. जर टाळूवरील त्वचा तेलकट असेल आणि तुम्हाला तुमचे केस रोज धुवावेसे वाटत असतील तर ड्राय शॅम्पुचा वापर करा. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमचा टाळू आणि केस आतून हायड्रेट राहण्यास आणि केस गळणे टाळण्यास मदत होते.

हेही वाचा :

टीममेटच्या बहिणीच्या प्रेमात रोहित ‘क्लिन बोल्ड’, अशी झाली लव्हस्टोरीची ‘ओपनिंग’

‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’, संजय राऊतांचं नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह विधान; ‘आमची बबलीसोबत…’

उद्या बँका बंद? ‘या’ शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?