बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आता साऊथ चित्रपटसृष्टीत(South cinema) आपल्या अभिनयाची आणि नृत्याची जादू दाखवणार आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या बाबतीत एक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे त्याचे चाहते आनंदाने उड्या मारू लागले आहेत. हृतिक रोशनने केजीएफ-कंताराचे निर्माते होम्बाले फिल्म्सशी हातमिळवणी केली असून प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन(South cinema) त्याच्या आगामी ‘वॉर-2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी देखील दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो चाहत्यांना खूप आवडला आहे.अशातच आता हृतिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ज्यामुळे चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत. कन्नड चित्रपट निर्मिती संस्था होम्बाले फिल्म्सने याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली आहे. हृतिक रोशन लवकरच एका साऊथ चित्रपटामध्ये दिसणार आहे.
निर्मात्याने याची घोषणा करताना X पोस्टमध्ये लिहिले आहे की, लोकं हृतिक रोशनला ग्रीक गॉड म्हणतात. सोशल मीडियावर देखील त्याचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्याने चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे. अभिनेत्याचा डान्स आणि अभिनय हा तर आपण पाहिलाच आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आम्हाला हृतिक रोशनचे होम्बाले फिल्म्स कुटुंबात स्वागत करताना अभिमान वाटतो. धैर्य, अभिमान आणि भव्यतेची एक कहाणी. जिथे गांभीर्याचा सामना कल्पनेशी होतो. महास्फोट सुरू होतो.
हृतिक रोशनने या प्रोजेक्टबद्दल आनंद व्यक्त केला आहे. होम्बले फिल्मसकडून करण्यात आलेल्या घोषणेवर अभिनेता म्हणाला की, होम्बले फिल्म गेल्या काही वर्षांपासून उत्तम कथा सादर करत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्यास आणि माझ्या चाहत्यांना एक खास सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही मोठी स्वप्ने पाहत आहोत आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास आम्ही सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया अभिनेता हृतिक रोशनने दिली आहे.
होम्बले फिल्मसने केलेल्या घोषणेमुळे चाहते खूप आनंदी झाले आहेत. होम्बले फिल्मसच्या घोषणेवर एका चाहत्याने लिहिले आहे की, आता आपण केजीएफ 3 मध्ये हृतिक विरुद्ध रॉकी भाई अशी कल्पना करू शकतो. तर इतर चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, जर प्रभास विरुद्ध हृतिक झाले तर काय होईल. दरम्यान, तिसऱ्या चाहत्याने उत्तर आणि दक्षिण चित्रपटांमधील समर्थनाचा आनंद साजरा केला आणि लिहिले की हे भविष्य आहे.
हेही वाचा :
UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल
आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!
उद्धव ठाकरेंचा बडा नेता शिंदेंच्या गळाला; सांगलीत राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग