सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोना बळावतोय, राज्यभरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

कोरोना(Corona) व्हायरसनं राज्यासह भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी देशभरातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती पावले उचलली जात आहे.

शिवाय स्थानिक प्रशासनाला ही त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुण्यासह राज्यभरात देखील रुग्णांच्या(Corona) संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सल्ला दिला आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र राज्यात 76 नव्या रुग्णांची भर पडली असून आता 425 अॅक्टिव कोरोना रूग्णांची संख्या आहे. तर मुंबईत 27 पुण्यात 21, आणि ठाण्यात 12 अॅक्टिव रूग्णांची संख्या आहे. तर देशभराचा विचार केला तर, देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या 1 हजार 200 पर्यंत पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान आणि इतर राज्यातसुद्धा सातत्याने कोरोना व्हायरस पसरत आहे. यामुळे राज्य सरकारकडून रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
मुंबई (Mumbai)-27
पुणे (Pune)-21
ठाणे (Thane)-12
कल्याण (Kalyan) -8
नवी मुंबई (Navi Mumbai) -4
कोल्हापूर (Kolhapur) -1
अहिल्यानगर (Ahilyanagar) -1,
रायगड (Raigad) -2

सध्या महाराष्ट्र राज्यात 76 नव्या रुग्णांची भर पडली असून आता 425 अॅक्टिव कोरोना रूग्णांची संख्या आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सर्वात जास्त कोरानाचे रुग्ण हे केरळ राज्यात आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे रुग्ण आहेत. तर इतर राज्यात सुद्धा कोरानाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय.

काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये नव्याने कोरोनाबाधित 5 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात 86 पर्यंत रुग्णांची संख्या झाली आहे. जर आपण दिल्लीतील कोरोनाच्या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर सोमवार (26 मे) पर्यंत दिल्लीत कोरोना विषाणूचे 104 सक्रिय रुग्ण होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात 24 रुग्ण बरे झाले. गेल्या आठवड्यात, दिल्ली सरकारने रुग्णालयांना बेड, औषधे आणि ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले होते.

हेही वाचा :

आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल

हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार