फटाके उडविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कुख्यात (crackers)‘जर्मनी गॅंग’मधील काहींनी सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. संजय प्रकाश हिटनळी वय २३, रा. दातारमळा आणि अनिरुद्ध अनिल डिंगणे २५, रा. धुळेश्वरनगर अशी त्यांची नावे आहेत.

सामाजिक कार्यकर्ते माणिक सदाशिव भंडारे वय ५०, रा. चिंतामणी गल्ली नं. ८, कोरोची यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ता. २१ रात्री भंडारे हे आपल्या घरासमोर कुटुंबीयांसमवेत फटाके उडवत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अनोळखी तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला.काही वेळानंतर ते तिघे आणखी तिघांसह पुन्हा मोटारसायकलीवरून आले आणि भंडारे कुटुंबीयांबरोबर वाद घातला. (crackers)वाद पेटताच एकाने, ‘आता याला सोडायचं नाही’, असे म्हणत भंडारे यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने सलग चार वार केले. त्याचवेळी त्यांचा मुलगा रतन व पत्नी मनीषा भंडारे यांच्यावर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. (crackers)पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. या प्रकरणात संजय हिटनळी आणि अनिरुद्ध डिंगणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ‘जर्मनी गॅंग’मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय कोंडुगळे, शुभम पट्टणकुडे व मेहबूब उकली यांची नावे समोर आली असून ते पसार आहेत.
हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण