नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही अन् पोटही भरणार.!

अनेकांना दिवसाची सुरूवात ही सकाळच्या पौष्टिक नाश्त्याने (breakfast)करायला आवडते. जर तुमची सुरूवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस हा चांगला जातो, असे म्हटले जाते. अनेकांना नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खायला आवडतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक हेल्दी आणि झटपट बनणारी रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे मसाला ऑम्लेट. सकाळच्या नाश्त्यात बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

मसाला ऑम्लेट बनवायला अतिशय सोपे आहे. या ऑम्लेटमुळे(breakfast) तुमच्या शरीराला भरपूर प्रोटिन मिळते. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात मसाला ऑम्लेटची सोपी रेसिपी.

मसाला ऑम्लेट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
-३-४ अंडी

-बटर

-५० ग्रॅम पनीर किसलेले

-१-२ कांदे बारीक चिरलेले

-२ टोमॅटो बारीक चिरलेले

-२-३ हिरव्या मिरच्या

-चवीनुसार मीठ

-तेल आवश्यकतेनुसार

-१ कप कोथिंबीर बारीक चिरलेली

मसाला ऑम्लेट बनवण्याची सोपी पद्धत :
-सर्वात आधी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा. या पॅनमध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेले पनीर, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला.

-यामध्ये थोडे पाणी मिसळून काही वेळ हे शिजू द्या.

-आता एका बाऊलमध्ये अंडी फोडून ती चमच्याच्या मदतीने चांगल्या प्रकारे फेटून घ्या.

-अंडी चांगली फेटून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे लाल तिखट आणि मीठ घाला.

-आता तुम्हाला हे फेटलेले अंड्यांचे मिश्रण कांदा-टोमॅटोच्या शिजत आलेल्या मिश्रणात टाकावे लागेल.

-आता काही मिनिटे हे मिश्रण चांगले शिजू द्या.

-आता या मिश्रणात थोडी कोथिंबीर, बटर घालून मसाला ऑम्लेट चांगल्या प्रकारे गरम करून घ्या.

-तुम्हाला हवे असल्यास या मसाला ऑम्लेटचे दोन भाग तुम्ही करू शकता. ब्रेडसोबत टोस्ट करून त्याला टोमॅटो सॉस लावून गरमागरम मसाला ऑम्लेट खाऊ शकता.

हेही वाचा :.

बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये रोहित नसणार अन् हार्दिकही…

आऊटडोअर फोटोशूट करताना ‘ही’ काळजी जरूर घ्या, नाहीतर…