मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा!

मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना सुरक्षित आणि हमी रिटर्न मिळणाऱ्या योजनांना प्राधान्य दिलं जातं.(scheme )अशा योजनांमध्ये पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना सर्वोत्तम मानली जाते. ही केंद्र सरकारची सुरक्षित योजना असून यात आकर्षक व्याजदर, करसवलत आणि लवचिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत.गुंतवणूक सुरुवात ₹1000 पासून केली जाऊ शकते आणि त्यानंतर ₹100 च्या पटीत रक्कम भरण्याची मुभा आहे. कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा नाही.आयकर कायद्यानुसार कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते, त्यामुळे ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते.

योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. दर वर्षाच्या शेवटी व्याज जमा होऊन ते पुढील वर्षासाठी पुन्हा गुंतवले गेलेले मानले जाते.(scheme ) कोणताही प्रौढ व्यक्ती स्वतःच्या नावाने हे खाते उघडू शकतो.तीन प्रौढ एकत्रितपणे संयुक्त खाते देखील उघडू शकतात. पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने खाते उघडू शकतात, तसेच 10 वर्षांवरील मुलं स्वतःच्या नावाने देखील खाते उघडू शकतात.

तुम्ही हवे तितके NSC खाती उघडू शकता, त्यावर कोणतीही संख्या मर्यादा नाही. (scheme )सध्या पोस्ट ऑफिस NSC स्कीमवर 7.7% वार्षिक व्याज दिलं जात आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही ₹10,000 गुंतवले, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला सुमारे ₹14,490 मिळतील – ज्यामध्ये ₹4,490 हे व्याजरूपात असतील. ही रक्कम हमी असलेली असून कोणत्याही बाजारातील चढ-उताराचा यावर परिणाम होत नाही.त्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी हे उत्तम आर्थिक साधन ठरू शकते.NSC खाते उघडण्यासाठी तुम्हाला फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसेच संचित व्याजाचे प्रमाणपत्र दरवर्षी मिळवण्यासाठी विनंती करता येते, किंवा पोस्टल इंटरनेट बँकिंगद्वारे ते डाउनलोड करता येते.

हेही वाचा :