शाळांना गणेशोत्सवात सुट्टी आहे की नाही? पालक आणि विद्यार्थी संभ्रमात

गणेशोत्सव सण जवळ आला की, कोकणातील चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. शाळांना(schools ) सुट्ट्या असल्याने पत्नी, मुलांसह गणपतीला गावाला जाण्याचे प्लॅन आखले जातात. ट्रेन, बसचं बुकिंग आधीच फूल होत असल्याने तिकीट आधीच काढून ठेवाव्या लागतात.

मात्र सीबीएसई, आयसीएसई, आयजी या अन्य मंडळांच्या शाळांनी(schools ) अद्याप गणपतीच्या सुट्ट्या जाहीर केल्या नसल्याने पालक संभ्रमात आहेत. सुट्ट्यांबाबतच्या संभ्रमामुळे शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याची अडचण निर्माण झाली आहे. यामुळे पालक, शिक्षकांबरोबरच आता स्कूल बस चालकांनीही राज्यमंडळाच्या शाळांप्रमाणे इतर मंडळांच्या शाळांनीही सुट्टी द्यावी, अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारने 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला लागून पाच दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सीबीएसई, आयसीएसई, मंडळाच्या शाळांना यंदा अद्यापपर्यंत तेश चतुचाचीही सुट्टी जाहीर केलेली नाही. शाळा बस चालक संघटनेनेही याविरोधात सरकारला पत्र दिलं आहे. विद्यार्थी, कर्मचारी व बसचालकांना सुट्टी दिली जावी अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजी या अन्य मंडळाच्या शाळांमध्ये मात्र गणेशोत्सवासाठी फक्त गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशीची म्हणजेच आगमन व विसर्जनाची सुट्टी दिली जाते. विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाची सुट्टी मिळत नसल्याने गावी जाण्याची अडचण निर्माण होते. इतकंच नाही या शाळांमधील कर्मचारी व शाळा बस कर्मचारी यांनाही गणेशोत्सवासाठी गावाला जात येत नाही. त्यातच यंदा अन्य मंडळाच्या शाळांनी गणेश चतुर्थीचीही सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवात मोठया प्रमाणात नागरिक गावाला जातात. कोकणात जाणाऱ्या ट्रेन, बस तर एक महिना आधीच आरक्षित होतात. राज्यमंडळाकडून शाळांना(schools ) पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजी या अन्य मंडळाच्या शाळांमध्ये गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशीची म्हणजेच आगमन व विसर्जनाची सुट्टी दिली जाते.

राज्य सरकारने 2025 या शैक्षणिक वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक महत्वाचे सण आणि कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यानुसार राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यमंडळाच्या शाळांना 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर म्हणजेच गौरी विसर्जनापर्यं सुट्टी देण्यात आली आहे. तसंच 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीचीही सुट्टी असेल. म्हणजेच राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात एकूण 8 दिवस सुट्टी असेल.

हेही वाचा :