भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलच धनश्री वर्मा सोबतच नातं तुटलं आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला.(response )त्यानंतर धनश्री वर्माला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हेट करण्यात आलं. आता युजवेंद्र चहलच नाव RJ महवश सोबत जोडलं जातय. बऱ्याचदा दोघे एकत्र दिसतात. अलीकडेच दोघे लंडन वेकेशनवरुन परतले. लंडनमध्ये चहलचा जोरदार बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो दिसले. आता लोकांनी महवशच्या व्हिडिओवर कमेंट करुन पती चोरण्याचा आरोप केलाय. त्यावर महवशने एक व्हिडिओ शेअर करुन प्रत्युत्तर दिलं आहे.
युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाल्यापासून महवश त्याच्यासोबत आहे. आयपीएल सीजनच्यावेळी टीम बसमधून जाताना दिसलेली. कपिल शर्माच्या शो मध्ये चहलने महवश सोबतच्या नात्याबद्दल काही हिंट दिले होते. आता ट्रोलिंगवर महवशने ‘या लोकांनीच मला चोरताना बघितलय’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.RJ महवशने एक व्हिडिओ शेअर केला, त्यानंतर या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली. कमेंट सेक्शनमध्ये एकाने लिहिलेलं “कोणाचा नवरा चोरणं? Cheating. त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं की, “या लोकांनीच मला चोरताना पाहिलय. (response )फक्त यांना व्यूज पाहिजे, काहीही बोलतात लोक” त्या शिवाय चीटिंगवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यावर कमेंट्सचा पूर आला आहे.
महवशने एक व्हिडिओ शेअर केला. त्यात काय-काय करणं चीटिंग आहे, या बद्दल ती बोलली. “कोणाला सिक्रेट मेसेज पाठवणं चीटिंग, शर्टलेस मुलांना आग वाले इमोजी पाठवणं चीटिंग. सेमी न्यूड कंटेंट बनवणाऱ्या मुलींना फॉलो करणं चीटिंग. आपलं स्नॅप चॅट आयडी लपवणं चीटिंग. कोणी तुम्हाला हिंट देतय आणि त्याला सांगणं तुम्ही सिंगल आहाते हे चीटिंग. कोणाला लपून भेटणं चीटिंग” असं ती या व्हिडिओमध्ये बोलली होती.
या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्स केले आहेत. युजवेंद्र चहलच लग्न झालेलं आहे हे माहित असताना त्याला डेट करणं चीटिंग नाही का? असं एकाने विचारलय. दुसऱ्याने लिहिलय युजी भाईच ऑटो लाइक करवणं चीटिंग. तो लंडनला गेला, त्याच्यामागे जाण, चीटिंग. एका युजरने लिहिलय की, युजवेंद्र चहल भाई काळजी घ्या.(response ) महवश आणि चहल दोघे मोठ्या प्रमाणात ट्रोल होतायत.
हेही वाचा :