कंगना रणौतचा खळबळजनक दावा, ‘कोणतीही नवीन हिरोईन आली की तिला दाऊदसमोर…’

आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री कंगना रणौत(claim) सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. हिमाचल प्रदेशमधून कंगणा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. प्रचार सभांमध्ये कंगणा रणौत विरोधकांवर जोरदार टीका करत आहे. आता तिने ‘एबीपी माझा’सोबत साधलेल्या संवादात तिने बॉलिवूडवरही भाष्य केले आहे.

कंगणा रणौतने एबीपी माझाच्या ‘आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे’ या शोमध्ये(claim) हजेरी लावली. त्यावेळी बॉलिवूड ते राजकारणावर थेट भाष्य केले. मी बॉलीवूडमध्ये घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवला पण राजकारणातही घराणेशाही माझी साथ सोडत नाही. पण राजकारणातही मी घराणेशाहीचा अंत करणार असल्याचे कंगणाने म्हटले. आपल्या मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावरही कंगणाने गंभीर आरोप केले.

काँग्रेस देशविरोधी पक्ष असल्याचा आरोप कंगणाने केला. त्यांनी देशाची येणारी पिढी संपवली. एकीकडे भाजप राष्ट्रवाद घेऊन देशात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष मतांच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचे काम करत असल्याचा धक्कादायक आरोप कंगणाने केला.

भाजप पुन्हा केंद्रात आल्यास संविधान बदलेल, या देशातील मुस्लिम असुरक्षित होतील, देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असा खोटा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्वांचा विकास होईल, अशी ग्वाही देशाला दिली आहे, मात्र काँग्रेस खोटे आणि द्वेषाचे राजकारण करत असल्याचे कंगणाने म्हटले.

काँग्रेस प्रेमाचे राजकारण करते असे म्हणते पण काँग्रेस रामलल्लाच्या भक्तांवर प्रेम करत नाही. काँग्रेस देशात घुसखोरांसोबत केवळ प्रेमाचे राजकारण करते. काँग्रेसला देशातील सर्वसामान्यांचा पैसा घेऊन घुसखोरांना श्रीमंत बनवायचे आहे. तर मोदीजी, भारतीय जनता पक्षाला गरीबांना श्रीमंत करायचे आहे, हा काँग्रेस आणि भाजपमधला फरक असल्याचे कंगणाने म्हटले.

या मुलाखतीत कंगनाने बॉलिवूडमधील काही गोष्टींवरही भाष्य केले. बॉलिवूडवर टीका करताना तिने गंभीर आरोप केले. कंगनाने म्हटले की, चित्रपटसृष्टीत असा नियम होता की, कोणतीही नवीन हिरोईन आली की तिला दाऊदला सलाम करावा लागायचा. 80 च्या दशकात तुम्हाला माहित असेल की प्रत्येक अभिनेत्याचे अंडरवर्ल्ड डॉनसोबत फोटो असायचे. प्रत्येक नवीन हिरोईनला डॉनकडे जावं लागायचं. पण आज बॉलीवूडमध्येही बदल झाला आहे. बॉलीवूडमध्येही स्वच्छता अभियान राबवले गेले असल्याचे कंगनाने म्हटले.

हेही वाचा :

‘तो’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार, राज्याच्या राजकारणाला कलाटणी…; सुनिल तटकरे

लहान मुलाला विचारलं, तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार; बच्चू कडू

माही भाई आता दिसणार नव्या भूमिकेत, ‘या’ कंपनीशी केला महत्त्वाचा करार!