अवघ्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका नराधमाने (station)पहाटेच्या सुमारास बसमध्ये तरूणीवर अत्याचार केला होता. याप्रकरणामुळे अख्खं पुणंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र अशाच एका निर्घृण गुन्ह्याची पुण्यात पुनरावृत्ती झाली असून पुन्हा एकदा गुन्ह्यांमुळे पुण्याचे नागरिक हादरले आहेत. कंपनीत कामावर निघालेल्या एका महिलेला ओढून नेत, तिच्यावर एक नराधमाने अत्याचर केला. एवढंच नव्हे तर त्याने तिला मारहाण केली आणि घडलेल्या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली किंवा तोंड उघडलं तर जीवानिशी मारेन अशी धमकीह त्याने दिली. यामुळे पुण्यात अतिशय दहशतीचे वातावरण आहे.

मात्र महिलेने घाबरून न जाता, तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे ठरवत चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. प्रकाश भांगरे असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी अवघ्या 24 तासांत त्याला बेड्या ठोकल्या.(station)मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना 13 मेच्या रात्री सुमारे 11 च्या सुमारास घडली. पीडित महिला 27 वर्षांची असून चाकण एका कंपनीत काम करते. 13 मे रोजी ती रात्रपाळीच्या ड्युटीसाठी कामावर जात होती. एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करते. त्या दिवशी ती मेदनकरवाडी येथील कंपनीच्या अगदी जवळ पोहचली होती. मात्र तेवढ्यात नराधम प्रकाश भांगरेने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
मात्र त्या महिलेने नराधामचा खूप प्रतिकार केला, त्याला चावलीदेखील. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच जाणाऱ्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीने पीडितेने कसेबसे चाकण पोलिस स्टेशन गाठत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगत तक्रार दाखल केली.(station) पीडित महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या 24 तासांच्या आतच नराधम आरोपी प्रकाश भांगरेला बेड्या ठोकल्यात. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलं. आरोपी सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला असला तरी तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय
‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल