भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार, चीनला गॅरंटी?

एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजारात प्रचंड उसळी, चीनकडून(government) भारतात मोदी सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शक्यताचिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 1 जूनला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले होते.

यानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोल्स जाहीर केले होते. यामध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए आघाडीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानंतर चीनमधील ग्लोबल टाईम्सनेही भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असे संकेत दिले आहेत. ग्लोबल टाईम्समधील लेखात म्हटले आहे की, भारतातील एक्झिट पोल्सचा अंदाज पाहता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतात. चिनी विश्लेषकांच्या मतानुसार, पंतप्रधान(government) मोदी देशांतर्गत आणि विदेशी धोरणे कायम राहतील. देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु राहतील, असेही ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे.

भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यास चीनकडून भारताशी द्विपक्षीय संबंध सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भारताशी काही मुद्दयांवरुन असलेले मतभेद दूर करण्याच्यादृष्टीने आणि संवाद सुरळीत ठेवण्यासाठी चीनकडून आगामी काळात भर दिला जाण्याची शक्यता आहे. 

भारताचे परराष्ट्र धोरण आणखी बळकट होणार

ग्लोबल टाईम्समधील लेखात नमूद केल्याप्रमाणे, पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे भारतीय नेते ठरतील. मोदी सत्तेत आल्यास भारताचे परराष्ट्र धोरण आणखी बळकट होईल. तसेच गेल्या काही काळापासून अंमलबजावणी करण्यात येणारेच परराष्ट्र धोरण कायम राहील. येत्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि चीननंतर सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्यादृष्टीने मोदी (government)सरकारकडून भर दिला जाईल, असा अंदाज चिनी विश्लेषकांनी वर्तविला आहे. 

एबीपी सी वोटर एक्झिट पोल

महायुती

भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 

महाविकास आघाडी

ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1

एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12

हेही वाचा :

कोल्हापूर हातकणंगले कार्यकर्त्यांची वाढली उत्कंठा ! कोण मारणार बाजी…

रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते…!

ठाकरे- पवार इज बॅक… आता बंडखोर काय करणार?; विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी