रविवारी मान्सूनने तळकोकणात वर्दी दिली होती. आज मान्सून मुंबईत पोहचला(monsoon) असून दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. आज सकाळपासून मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठा पाऊस पडतोय. पुढील ४ दिवस मुंबई मध्ये पाऊस कायम राहील मात्र त्याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे शहरात आज सकाळपासून आभाळ होतं आणि त्यानंतर आज पुणे शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली. शहरात आज येलो अलर्ट असून राज्यातील पुढील ४ दिवसात राज्यातील सर्व जिल्ह्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे

येत्या ५ दिवसात मॉन्सून सर्व राज्यात पोचणार असून पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून शहराला यलो (monsoon)अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने मान्सून राज्यात लवकर दाखल झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.
रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. आज मुंबईत देखील मान्सून आला आहे. पुणे सोलापूर मध्ये देखील मान्सून आज दाखल झाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवस मुंबईत धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसासाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सून यंदा लवकर आला आहे. प्रत्येकवर्षी मान्सून ८ जून रोजी दाखल होतो. राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बारामती मध्ये १३० मिली पाऊस झाला आहे. मोठ्या पावसाची नोंद इथ झाली आहे. येणाऱ्या ४ दिवस पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर शहराला येलो अलर्ट देण्यता आला आहे.येणाऱ्या ५ दिवसात मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल. कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.(monsoon) तर मध्य महाराष्ट्रालाही ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सर्व नियोजन व्यवस्थित करावं , कृषी विभागाने दिलेल्या गाईडलाइन पाळावी, असे सांगण्यात येत आहे. बारामती इंदापूर मध्ये पुढील २ दिवस पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा :
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर
‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission