सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पुन्हा लिहिलं पत्र; दिलं ‘हे’ वचन

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर(rewrites) हा अनेकवेळा तुरुंगातून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहित असतो. सुकेश हा या पत्रांमधून अनेकवेळा जॅकलिनवर असणारं त्याचं प्रेम व्यक्त करतो. आता सुकेशनं आणखी एक पत्र जॅकलिनला लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून सुकेशनं जॅकलिनला तिच्या ‘यिम्मी यम्मी’ या गाण्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुकेशनं या पत्रातून जॅकलिनला एक प्रॉमिस देखील केलं आहे.

सुकेशनं पत्रात जॅकलिनला तिच्या ‘यिम्मी यम्मी’ या नव्या गाण्याच्या लॉन्चबद्दल अभिनंदन केले. एवढेच नाही तर त्याने हे गाणे सर्वाधिक वेळा पाहणाऱ्या टॉप 100 लोकांसाठी बक्षीस देखील जाहीर केली. सुकेशने पत्रात(rewrites) जॅकलिनला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्याचे वचन दिले आहे.

सुकेशने गेल्या वर्षी देखील जॅकलिनला एक पत्र लिहिले होते. ज्यात त्याने जॅकलिनला पुढचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचे आश्वासन दिले होते.दोनशे कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या सुकेशवर बरेच आरोप करण्यात आले आहेत. सुकेशनं जॅकलिनला काही भेटवस्तू अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी जॅकलिननं सुकेशच्या विरोधात तक्रार केली होती. सुकेश मला धमक्या देत असून त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत, असे जॅकलिननं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र आता तिनं तिची तक्रार मागे घेतली आहे.

जॅकलिनचं ‘यिम्मी यम्मी’ हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेकजण या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत.

हेही वाचा :

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा ‘या’ 5 गोष्टी; सुख-समृद्धीत होईल भरभराट

पुढील ४ दिवस पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता

एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई; रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी