आता कमी होणार ‘स्पॅम कॉल’ चा त्रास…
फ्रॉड कॉल, स्पॅम(spam) कॉल याच्यामुळे आपण सतत त्रस्त होत असतो. यातून फसवणुकीचा धोका देखील असतो. असे स्पॅम कॉल आणि मेसेंग येणारे नंबर आपण ब्लॉक करत असतो,स्पॅम रिपोर्ट करत असतो. पण असे कॉल्स आले कि आपल्याला चटकन कळेल काय किंवा असे कॉल बंद होतील काय हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असेल.
मोबाईल वापरण्याचा अनुभव खराब करणाऱ्या स्पॅम(spam) कॉल आणि एसएमएस कमी होणार का? या प्रश्नाचं उत्तर आता हो असं वाटतंय. कारण, मोबाईल कंपन्या आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्या यांच्यात या त्रासदायक कॉल स्पॅम आणि मेसेजेस् कमी करण्यासाठी करार झाला आहे.
Cellular Operators Association of India (COAI) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टेल्को कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्पॅम कॉल आणि एसएमएस कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात ब्लॉकचैनसारख्या तंत्राचा वापर केला जाणार आहे. यामुळे गेल्या काही वर्षात एसएमएस द्वारे येणाऱ्या स्पॅममध्ये मोठी घट झाल्याचही या अहवालात म्हटलं आहे.
मात्र, फोनवर येणारे स्पॅम कॉल अजूनही एक मोठी समस्या आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आणि टेल्को कंपन्या एकत्रित प्रयत्न करत आहेत. सध्या, प्रमोशनल कॉलसाठी 140 नंबरची मालिका आणि ट्रान्झॅक्शन आणि सेवांशी संबंधित कॉलसाठी 160 नंबरची मालिका सरकारद्वारे नियोजित करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्या प्रकारचा कॉल आहे ते ओळखणे सोपे जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या त्रासाला आळा घालणारे स्पॅम कॉल आणि मेसेजेस् रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण विभाग नवीन नियमावली तयार करत आहे. नियमावली लागू झाल्यानंतर बँका, फिनटेक् कंपन्या, रिअल एस्टेट कंपन्या आणि इतर संस्था यांनाही त्यांच्या स्पॅम कॉल आणि मेसेजेस्ची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कारण, अशा संस्था अनेकदा प्रमोशनलसाठी थर्ड पार्टी एजन्सीजची मदत घेतात. या नियमावलीमुळे अशा अनधिकृत टेलीमार्केटर्सवर कारवाई करणे सोपे होईल, असं COAI चे Director-General SP कोचर यांनी सांगितलं.
आत्तापर्यंत, ट्राई अंतर्गत येणारा The Telecom Commercial Communication Customer Preference Regulation (TCCCPR) हा नियम स्पॅम कॉल आणि मेसेजेस् रोखण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र, आता टेल्को कंपन्या, टेक्नो कंपन्या आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भविष्यात स्पॅम कॉल आणि मेसेजेस् कमी होण्याची मोठी आशा आहे.
हेही वाचा :
विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
भाजपच्या कमी जागा आल्यास बाजार कोसळणार?
‘पुष्पा २’ मध्ये समांथा रुथ प्रभू नाही तर ‘हि’ नॅशनल क्रश गाजवणार चित्रपट