कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या

मुंबई: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीच्या(political) मुदतपूर्व सुटकेचा मार्ग उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोकळा केला असतानाच भाजपने गवळीच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना बहीण संबोधून महापौर बनवण्यासाठी मदत करण्याचे दिलेले आश्वासन त्याचेच निदर्शक मानले जाते.

नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून(political) अरुण गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती.

२००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते. याप्रश्नी सरकारला येत्या दोन आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे.

लोकसभेच्या धामधुमीत ही घटना घडत असल्यामुळे तिचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढीची शक्यता होती. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (अरुण गवळी) अ.भा.सेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले.

एकेकाळी अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे तुमचा दाऊद तर आमचा गवळी असे म्हटले होते. शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर गवळीने स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. अरुण गवळी आमदार झाला. कन्या गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे महापालिका निवडणुकीत विजयी झाले.

गीता गवळीची महापालिकेत शिवसेनेशी जवळीक होती, परंतु अलीकडच्या काळात भाजपशी जवळीक वाढली होती. न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे.

२००४ च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अरुण गवळी ‘अभासे’कडून उभा होता, त्यावेळी ९२ हजार २१० मते मिळाली. चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून २००४ रोजी अरुण गवळीने विजय मिळवला होता. त्याला ३१ हजार ९६४ मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला. अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांनी २०१४ आणि २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अनुक्रमे २० हजार ८९५ आणि दहा हजार ४९३ अशी मते मिळाली होती.

हेही वाचा :

56 वर्षांच्या अभिनेत्यासोबत 26 वर्षीय अभिनेत्रीचा रोमान्स

फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितलं

आता ४ वर्षाच्या ग्रॅज्युएशननंतर थेट देता येणार NET ची परीक्षा; UGC चा नवीन नियम