भारतीय क्रिकेटचा दमदार ऑलराऊंडर आणि दोन वेळचा वर्ल्ड कप (sports news)विजेता युवराज सिंह पुन्हा एकदा आयपीएलच्या रंगमंचावर दिसणार आहे. पण यावेळी जर्सी क्रमांक १२ नव्हे, तर हेड कोचच्या भूमिकेत. लखनौ सुपर जायंट्स (LSG) फ्रँचायझीकडून २०२६ सीझनसाठी युवराजला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची चर्चा सध्या जोरात आहे. फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांनी युवराजसोबत अंतिम टप्प्याच्या चर्चेला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. हा करार निश्चित झाला, तर लखनौ संघासाठी हा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

गेल्या दोन हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. जस्टिन लॅंजर यांच्या नेतृत्वाखाली संघाला प्लेऑफ गाठण्यात अपयश आलं. त्यातच बॉलिंग सल्लागार झहीर खानचा निरोप आणि नवीन स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर म्हणून केन विल्यमसनची एन्ट्री, यामुळे फ्रँचायझी स्पष्टपणे नव्या दिशेकडे जात आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर युवराज सिंहला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या आगमनाने संघाचं संपूर्ण वातावरण आणि दृष्टिकोन बदलण्याची शक्यता मानली जाते.

युवराज सिंहने गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमधल्या(sports news) नव्या पिढीला आकार दिला आहे. त्याच्याकडून ट्रेनिंग घेतलेल्या शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि प्रभावसिंह यांसारख्या खेळाडूंनी त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळातील आत्मविश्वास आणि मानसिक ताकद वाढवली. त्याच्या “गेम सिच्युएशन ड्रिल्स” आणि “मेंटल टफनेस ट्रेनिंग”मुळे तो सध्या तरुण खेळाडूंमध्ये आदर्श ठरत आहे. त्यामुळेच लखनौसारख्या तरुण आणि टॅलेंटेड कोअर असलेल्या संघासाठी युवराज हा परफेक्ट फिट ठरू शकतो.

आक्रमकता, निर्धार आणि बिनधास्त खेळ असा युवराज सिंहचं क्रिकेटिंग तत्त्वज्ञान नेहमीच स्पष्ट राहिलं आहे 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कपमधील त्याची झुंजार वृत्ती आजही चाहत्यांना आठवते. लखनौ सुपर जायंट्सवर अनेकदा ‘कंझर्व्हेटिव्ह’ खेळ केल्याची टीका झाली आह. विशेषतः मधल्या षटकांत. युवराजच्या कोचिंगखाली संघात आक्रमकता, स्पष्टता आणि आत्मविश्वासाचा नवा संस्कार दिसू शकतो.

युवराजसाठी हा फक्त “कमबॅक” नाही, तर नव्या करिअरची सुरुवात आहे. त्याने याआधी अबू धाबी टी-10 लीगमध्ये थोडक्यात मेंटर म्हणून काम केलं होतं, पण आयपीएलमध्ये(sports news) ही त्याची पहिली अधिकृत प्रशिक्षक भूमिका ठरेल. गौतम गंभीरप्रमाणेच आता युवराज सिंहही आयपीएलच्या डगआउटमधून नवा प्रभाव निर्माण करण्यास सज्ज आहे. भारतातील माजी मॅचविनर्स आता कोचिंगमध्ये पाऊल टाकत असून, आयपीएलचा कोचिंग इकॉनॉमी हळूहळू नव्या दिशेने बदलत आहे.

लखनौ सुपर जायंट्सकडून युवराज सिंहची ही संभाव्य एन्ट्री केवळ एका फ्रँचायझीसाठी नव्हे, तर भारतीय क्रिकेटमधील नवा विचार, नवी ऊर्जा आणि नव्या नेतृत्वाची सुरुवात ठरू शकते.

हेही वाचा :

पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे Video Viral

आमदार राहुल आवाडे यांच्या पाहणी दौऱ्यात इचलकरंजीचा सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत

डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *